नापास करण्याची धमकी देत शिक्षकांकडून सहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार, पीडिता गर्भवती झाल्यानंतर संतापजनक कृत्य उघड

| Updated on: Jun 10, 2021 | 3:17 PM

एका माध्यमिक शाळेच्या दोन शिक्षकांनी मिळून एका सहावी इयत्तेतील विद्यार्थीनीवर बलात्कार केला (sixth class student minor girl raped by Two teacher in Rajasthan ).

नापास करण्याची धमकी देत शिक्षकांकडून सहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार, पीडिता गर्भवती झाल्यानंतर संतापजनक कृत्य उघड
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

जयपूर : राजस्थानात एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती तुम्हाला दिली तर मुली आजही खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न तुमच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे आपल्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. शिक्षक आपल्याला घडवतात. याशिवाय गुरु-शिष्याच्या नात्याबाबत आपल्या देशात एक मोठी परंपरा राहिलेली आहे. मात्र, गुरु-शिष्याच्या या नात्यालाच काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात घडली आहे. एका माध्यमिक शाळेच्या दोन शिक्षकांनी मिळून एका सहावी इयत्तेतील विद्यार्थीनीवर बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण राजस्थान हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे (sixth class student minor girl raped by Two teacher in Rajasthan ).

गर्भवती झाल्याचं समजल्यानंतर संबंधित प्रकार उघड

संबंधित घटना ही जोधपूरच्या मोकमगढ भागातील एका सरकारी शाळेत घडली आहे. पीडितेची अचानक तब्येत बिघडली. तिला रुग्णालयात दाखल केलं. तिथे तपासणी केल्यानंतर जी माहिती समोर आली त्याने तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामागील कारण म्हणजे इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थी गर्भवती होती. तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन चर्चा केली. यावेळी तिने रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कुटुंबियांना माहिती दिली (sixth class student minor girl raped by Two teacher in Rajasthan ).

अखेर मुलीने घडलेला प्रकार सांगितला

मुलगी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत गेली होती. तिथे तिच्या दोन शिक्षकांनी तिला गोड बोलून एका खोलीत नेलं. त्यानंतर किळसवाणं आणि संतापजनक कृत्य केलं. आरोपी शिक्षक एवढ्यावरच थांबले नाहीत तर नापास करु अशी भीती दाखवून आरोपींनी तीन ते चार वेळा तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय कुणालाही याबाबत न सांगण्याचं बजावलं, अशी माहिती पीडितेने कुटुंबियांना दिली.

पीडितेचे वडिलांची पोलिसात तक्रार

संबंधित सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर पीडितेच्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात शिरली. त्यांनी थेट पोलीस ठाणे आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी देखील विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपी शिक्षकांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे संबंधित परिसरासह संपूर्ण राजस्थान राज्य हादरलं आहे. आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता वाढू लागली आहे.

हरियाणात तिसरीतल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

विशेष म्हणजे हरियाणात देखील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी इयत्ता तिसरीत शिकत आहे. घराजवळच्या शाळेच्या अंगणात 25 मे रोजी ती खेळत होती. नराधम अल्पवयीन पोरांनी शाळेच्या मैदानात मुलीला खेळताना पाहिलं. सहा-सात जणांच्या टोळीनं तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणारी ही मुलं अल्पवयीन आहेत. आठ ते चौदा या वयोगटातील आहेत. इतक्या लहान वयातील मुलांनी, असं कृत्य केल्याने सगळा देश हादरुन गेलाआहे.

नराधम पोरांनी बलात्कार तर केलाच पण घटनेचा सगळा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. मोबाईलवर शूट केलेला व्हिडिओ संबंधित मुलांनी अनेकांच्या व्हाट्सअप वर पाठवला. ज्यावेळेस पोरांच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस त्यांना देखील हादरा बसला. याप्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

‘जीने के लिए सोचाही नहीं, दर्द सवारने होगे’ गाणं गात व्हिडीओ बनवला, नंतर अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, क्रौर्याची परिसीमा गाठली, झाडाला लटकवलं