माद्रिद : एका स्पॅनिश महिलेने स्वतःच्याच अपहरणाचे नाटक रचून पतीकडून लाखो रुपये उकळले. जुगार खेळण्याचे व्यसन लागलेल्या महिलेने अपहरणाचा बनाव रचला आणि खंडणीच्या नावाखाली तिच्या आजारी पतीकडून लाखो रुपये उकळले. या पैशातून ती जुगार खेळली. मात्र ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी महिलेला अटक केली. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.
काय आहे प्रकरण?
‘मिरर यूके’च्या वृत्तानुसार, एका स्पॅनिश महिलेने तिच्या जुगाराच्या व्यसनामुळे एक अद्भुत नाट्य रचले. महिलेला बिंगो कार्ड (Bingo Cards) खेळण्याची सवय होती. यासाठी तिला अधिक पैशांची गरज भासली, तेव्हा तिने स्वत:च्या अपहरणाचे नाटक रचले, तेही पती रुग्णालयात दाखल असताना.
5 लाखांची खंडणी
महिलेने पतीला मेसेज करून आपल्या अपहरणाची खोटी माहिती दिली. आपल्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांना 5 लाखांची खंडणी हवी असल्याचे तिने सांगितले. पत्नीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच पतीने अपहरणकर्त्याला पाच लाख रुपये दिले.
पोलिसांना सुगावा लागला आणि बिंग फुटले
खंडणीची रक्कम मिळताच महिलेने जुगार खेळता यावा, म्हणून बिंगो कार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली. इकडे महिलेच्या पतीने अपहरणकर्त्यांना पैसे दिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रॅक केले असता या सगळ्यामागे एक महिला असल्याचे समोर आले. प्रत्यक्षात या महिलेचे ना अपहरण झाले होते, ना कुठला आरोपी होता.
त्यानंतर पोलिसांनी महिलेला कॅसिनोमधून अटक केली. सध्या तिची जामिनावर सुटका झाली असली तरी खटल्याची सुनावणी सुरू आहे. बनावट अपहरण आणि खंडणीसाठी तिला तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते.
संबंधित बातम्या :
मुंबईतून बुलेट चोरी, अमरावतीत विक्री, सराईत बाईकचोराला बेड्या
CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या
‘पप्पांनी एका माणसाला मारुन जमिनीत पुरलं’, 13 वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात तक्रार