पुणे- शहरातील पद्मावती परिसरातील अण्णाभाऊ साठे सभागृहातील तब्बल2 कोटी रुपयांचे स्पिकर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरी पकडली जाऊ नये यासाठीचोरांकडून आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. सभागृहात एकूण 12 स्पिकर्सची चोरी झाली आहे. लॉकडाउननंतर कोरोना नियमामध्ये शिथिलता आणता, शहरातील सभागृह सुरु कारण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या दक्षता पथकाने अण्णाभाऊ साठे सभागृहाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान ही चोरी उघडकीस आली आहे.
विविध कार्यक्रमासाठी केली उभारणी
विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काही वर्षांपूर्वी पद्मावती येथे हे अण्णाभाऊ साठे सभागृह उभारण्यात आले होते. या सभागृहामध्ये महापालिकेने एका खासगी कंपनीचे उत्कृष्ट दर्जाचे स्पिकर्स बसवले होते. मात्र कोरोनाच्या काळात सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे सभागृहात कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत, तसेच बंद होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात हे सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात महापालिका प्रशासनाने सभागृहाची पाहणी केली. यावेळी 12 स्पिकर्स काढण्यात आले असून त्याठिकाणी बनावट स्पिकर्स बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत चोरी
कोरोनामुळ कार्यक्रम बंद असले तरी, सभागृहात सुरक्षा रक्षक होते. मात्र तरीही सभागृहातील स्पीकर्सची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यामहागडे स्पीकर्स चोरत त्या ठिकाणी हलक्या दर्जाचे स्पीकर्स लावण्यात आले आहेत. याचाच माहितीतल्या चोरानेच ही चोरी केले आहे. तसेच चोरीची घटना उघड झाल्यानंतरही केवळ तक्रार केल्याचे कागदी घोडे सभागृहात नाचवाण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.
Hansika Motwani | ‘तेरे नाम’ फेम हंसिका मोटवानीचं बिकिनी कलेक्शन, सोशल मीडियावर डिझाईन्सची चर्चा!
रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे ‘असे’ करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला