नांदेड : येथे पोलीस भरतीमध्ये एका उमेदवाराकडे रिकामे इंजेक्शन आणि इंजेक्शनची बॉटल सापडली आहे. या तरुणाला आणि त्याच्याकडे सापडलेल्या वस्तू वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. या तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. पोलीस भरतीसाठी आलेला हा तरुण पालघर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आलंय. त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव घेतल्याचा संशय आहे. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर यातलं तथ्य उघड होणार आहे. तूर्तास यावर पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाकलंय.
सध्या महाराष्ट्रात पोलीस भरत्या सुरू आहेत. यात मात्र डोपिंगसारखे प्रकार घडले असतील, असे आपल्याला वाटत नाही. असे सांगून रामदास तडस यांनी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, डोपिंग हे खेळाडूंसाठी सर्वात घातक आहे. दहा वर्षात अनेक प्रकरणे डोपिंगची समोर आली आहेत. डोपिंग करणाऱ्या खेळाडूंना आज काही वाटत नाही. पण येणाऱ्या काळात त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे थांबले पाहिजे यासाठी शासनाकडे आम्ही कुस्तीगिर परिषदेच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत, असं खासदार रामदास तडस म्हणाले. ते वर्धा येथे बोलत होते.
ऑलिम्पिक, राष्ट्रकूल आणि कॉमनवेल्थ सारख्या खेळात देखील असे प्रकार समोर आले. यापुढे खेळाडूंची आरोग्य चाचणी घेऊनच त्याला खेळू दिले पाहिजे. याशिवाय खेळाडूंनी देखील डोपिंगसारख्या प्रकारापासून दूर राहिले पाहिजे, असं आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे.