घरभाडे देण्यासाठी रिक्षा चोरली अन् चालकालाही संपवले, ‘असा’ रचला हत्येचा कट

| Updated on: Sep 18, 2022 | 1:58 AM

तपासादरम्यान पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार आरोपींना अटक केली आहे. आरोपीने आधी रिक्षाचालकाला बहाण्याने घरी बोलावले होते. त्यानंतर त्याची हत्या केली.

घरभाडे देण्यासाठी रिक्षा चोरली अन् चालकालाही संपवले, असा रचला हत्येचा कट
उत्तर प्रदेशात पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले
Image Credit source: TV9
Follow us on

लखनौ : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडून टाकलंय. अनेकांचे अजूनही उपासमार होतेय. अनेकजण बेघरही झालेत. घराचे भाडे देण्यासाठीही काहींकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत गुन्हेगारी वाढली आहे. एका कुटुंबाने त्यांच्याकडे घरभाडे (Rent) देण्यासाठीही पैसे नसल्यामुळे एका रिक्षाचालकाची हत्या (Murder) केली. चालकाची हत्या केल्यानंतर त्याची ई-रिक्षा (E-Rikshaw) आरोपींनी चोरली. या घटनेने उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मृतदेह गोणीत भरला आणि जंगलात फेकला

ई-रिक्षा चालकाची हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरण्यात आला. त्यानंतर तो निर्जनस्थळी जंगलात फेकून देण्यात आला. आरोपीने त्याचे दोन मुलगे आणि लहान सून मिळून रिक्षाचालकाची हत्या केली.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत चालकाची ई-रिक्षा आणि बॅटरी विकून घराचे भाडे भरायचे होते, असे आरोपीने पोलीस चौकशीत कबूल केले आहे.

हे सुद्धा वाचा

रिक्षाचालकाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण

गाझियाबादच्या लोणी येथील सालेह नगर कॉलनीत राहणाऱ्या सुभाष नावाच्या ई-रिक्षा चालकाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. त्याची रिक्षाही गायब होती. यानंतर त्याचा मृतदेह जंगलात गोणीत बंद अवस्थेत फेकल्याचे आढळून आले.

याप्रकरणी शुक्रवारी ट्रॉनिका सिटी परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे हलवली.

एकाच कुटुंबातील चौघांना अटक

तपासादरम्यान पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार आरोपींना अटक केली आहे. आरोपीने आधी रिक्षाचालकाला बहाण्याने घरी बोलावले होते. त्यानंतर त्याची हत्या केली.

गुन्हा केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याचे दोन मुलगे आणि सुनेला अटक केली आहे. या सर्वांनी खुनात सहभाग घेतला होता.

घरमालकाचा भाड्यासाठी दबाव

सर्व आरोपी सालेह कॉलनीत भाड्याने रिक्षा चालवतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत व्यक्तीही ई-रिक्षा चालवायचा. मृत रिक्षाचालक हा आरोपींच्या ओळखीचा होता.

आरोपींनी अनेक दिवसांपासून घराचे भाडे दिले नव्हते. याबाबत घरमालक त्यांच्यावर दबाव आणत होता. याच चिंतेतून आरोपींनी सुभाषला घरी बोलावून चाकूने वार करून त्याची हत्या केली आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली.

खून केल्यानंतर आपण सुभाषची ई-रिक्षा आणि बॅटरी विकून घराचे भाडे देऊ, असे वाटल्याने ही हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ब्रिजेंद्र, रमेश, गोपाल आणि रिंकी यांना अटक केली आहे.