धमतरी : छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात एका प्रेमी जोडप्याने विष प्राशन केले. यामुळे प्रियकराचा जागीच मृत्यू झाला, तर प्रेयसीला गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल कुरुडमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रकरण कुरुड परिसरातील परखंडा गावाचे आहे. घटनेची माहिती मिळताच कुरुड पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. (Suicide by poisoning a loving couple after marriage, death of a lover)
बुधवारी सकाळी परखंडा येथील लोकांनी गावातील गोठणजवळ तरुण आणि तरुणीला पडलेले पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला. पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत काळेश्वर पटेल या युवकाचा आधीच मृत्यू झाला होता. तर त्याची प्रेयसी इतेन्द्रीचा श्वासोच्छवास सुरु होता. पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी परखंडा गावात राहणारा कालेश्वर पटेल हा रोजंदारी करण्यासाठी कांकेर परिसरात गेला होता. जिथे तो करपवंद येथील रहिवासी इतेन्द्री यादवच्या प्रेमात पडला. दोघेही मंगळवारी रात्री गावात आले होते आणि गौठानजीकच्या मंदिरात लग्न झाल्यानंतर दोघांनी विष प्राशन केले. एसपी प्रफुल्ल कुमार ठाकूर यांनी सांगितले की, घटनास्थळावरून विषाची बाटली आणि लग्नाचे साहित्य सापडले आहे. इतेंद्री शुद्धीवर आल्यानंतरच संपूर्ण प्रकरण कळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या कुरुड पोलिस घटनेचा सखोल तपास करीत आहेत.
मध्य प्रदेशात गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इंदूरमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जेथे बदमाशांनी एका तरुणाची चाकूने हत्या केली आहे. घटना जिल्ह्यातील बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. प्रथम बदमाशांनी मयत तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, जेव्हा तरुणाला दिसायचे बंद झाले तेव्हा त्यांनी त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
आकाश असे मयत तरुणाचे नाव सांगितले जात आहे. जुन्या शत्रुत्वामुळे ही हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सांगितले जात आहे की तो तरुण पत्नीला सोडून परत येत होता. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बदमाशांनी संधी दिसताच त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांनी आधी तरुणांचा माग काढला आणि नंतर ही घटना घडवली.
पत्नीला सर्पदंश करुन तिची हत्या केल्याप्रकरणी केरळातील पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हुंड्यासाठी 25 वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करुन हत्या केल्याप्रकरणी सुरज दोषी आढळला होता. कोल्लमच्या सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत शिक्षेची सुनावणी केली. बचाव पक्षाने सुरजला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र सुरजला जन्मठेपेची शिक्षा सुरु करण्यापूर्वी दोन आरोपांखाली सलग 10 वर्षे आणि 7 वर्षे शिक्षा भोगावी लागेल. त्याला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (Suicide by poisoning a loving couple after marriage, death of a lover)
Crime : आधी डोळ्यात मिरची फेकली, नंतर चाकूने केले अनेक, तरुणाचा जागीच मृत्यूhttps://t.co/s1J2XCihIk#Murder |#MadhyaPradesh |#Youth |#Death
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2021
नाशिकमध्ये भीषण अपघात, कारची उभ्या ट्रकला धडक; दोन मॅनेजरसह मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार
घरफोडीनंतर निराशा, उपजिल्हाधिकाऱ्यांना चिठ्ठीतून जाब विचारणारा 24 वर्षांचा चोर सापडला