पुणे : गेल्या आठवडाभरापासून पुणे पोलीस स्वर्णव चव्हाणचा (Swarnav Chavan) शोध घेत होते, पोलिसांना अखेर यश आले आणि स्वर्णव सापडला. त्यानंतर पुण्याच्या महापौरांनी पुणे पोलिसांचे आभार मानत, स्वर्णव सापडल्याचे ट्विट करत कळवले. स्वर्णमचा शोध घेताना नेटकऱ्यांनी हे प्रकरण चांगलचं उचलून धरलं होतं. महापौरांच्या (Mayor murlidhar Mohol) या ट्विटवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन @PuneCityPolice! बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला 4 वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय? @CPPuneCity यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! असे ट्विट करत महापौरांनी या चिमुकल्याचा त्याच्या आईवडिलांसोबतच फोटो ट्विट केला. त्यानंतर नेटकरीही भरभरून व्यक्त झाले आहेत.
स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन @PuneCityPolice !
बालेवाडी परिसरातील अपहरण झालेला ४ वर्षीय स्वर्णव चव्हाण आज सापडला. पालकांच्या कुशीत असलेला स्वर्णवला पाहण्यासारखं दुसरं सुख ते काय?@CPPuneCity
यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! pic.twitter.com/MT9vV00fHt— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 19, 2022
सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे सवाल
काहींनी पुणे पोलिसांचे अभिनंदन करताना, गूड वर्क टीम, असे लिहले आहे, तर एकाने ही सर्वात आनंदाची बातमी आहे, असे लिहिले आहे. एकाने अपहरण करणारा सापडला ना? असा सवालही केला आहे. ह्यामागचा सूत्रधार कोण आहे? ह्याची माहिती पुणेकरांना मिळाली पाहिजे!! चायना व्हायरसचा ताण असून पण बऱ्याच नेटिझन्स ने ऑनलाइन प्रयत्न सुरू ठेऊन प्रकरण थंड होणार नाही याची काळजी घेतली, नाहीतर गरीब सामान्य माणसाचे प्रकरण दोन दिवसात कसे गार होते हे आम्हाला माहिती आहे…अशा आशयाच्या कमेंटही आल्या आहेत.
स्वर्णवचे अपहरणकर्ते कोण?
डूग्गूचा तातडीने सुत्रं हालवत स्वर्णवचा शोध घेतला, मात्र त्याचे अपहरणकर्ते कोण आहेत. हे अजूनही कळाले नाही. त्याच्या शोधासाठी पोलीस पथकांच्या माध्यमातून शोध सुरु होता. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास तीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलीस शोधत आहेत. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे.