दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहाय्यक विभव कुमार विरोधात आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विभव कुमारवर स्वाती मालिवाल यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप केलाय. विभव कुमारने माझ्या कानशिलात लगावली, त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. शरीराच्या संवेदनशील भागांवर तसच पोटात मारलं असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे. ‘मला सोड, मारहाण करु नको’ म्हणून 39 वर्षाच्या स्वाती मालिवाल विभव कुमारकडे विनंती करत होत्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडला. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. हे सर्व त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. हा सर्व प्रकार सोमवारी घडला. त्यानंतर आम आदमी पार्टीने स्वाती मालिवाल यांच्याबरोबर गैरवर्तन झाल्याच मान्य केलं होतं. त्यावेळी पोलिसात तक्रार नोंदवली नव्हती.
गुरुवारी स्वाती मालिवाल यांनी पोलिसात धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी विभव कुमार विरोधात एफआयआर नोंदवला आहे. विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. स्वाती मालिवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “माझ्या बरोबर जे झालं, ते खूप वाईट झालं. माझ्या बरोबर जे घडलं, ते मी पोलिसांना सांगितलं आहे. योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा” असं स्वाती मालिवाल यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलय.
स्वाती मालिवाल यांनी पोस्टमध्ये काय म्हटलय?
“मागचे काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. ज्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली, त्यांची मी आभारी आहे. दुसऱ्या पार्टीच्या इशाऱ्यावरुन मी असं करतेय असं म्हणून काहींनी माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, देवाने त्यांना सुद्धा आनंदी ठेवाव” असं स्वाती मालिवाल यांनी X वरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मेरे साथ जो हुआ वो बहुत बुरा था। मेरे साथ हुई घटना पर मैंने पुलिस को अपना स्टेटमेंट दिया है। मुझे आशा है कि उचित कार्यवाही होगी। पिछले दिन मेरे लिए बहुत कठिन रहे हैं। जिन लोगों ने प्रार्थना की उनका धन्यवाद करती हूँ। जिन लोगों ने Character Assassination करने की कोशिश की, ये बोला…
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 16, 2024
तब्बल चार तास तपास पथक मालिवाल यांच्या निवासस्थानी
अतिरिक्त पोलीस आय़ुक्त ACP रँकच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम स्वाती मालिवाल यांच्या निवासस्थानी गेली होती. त्यांनी मालिवाल यांची जबानी नोंदवून घेतली. तपास पथक जवळपास चार तास तिथे होतं. त्यांनी खासदार मालिवाल यांच्याकडून प्रत्येक गोष्ट जाणून घेतली. पोलिसांनी विभवकुमार विरोधात IPC च्या कलम 354, 506, 509 आणि 323 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय.