चेन्नई : तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा क्रूर छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाची पाठ आणि प्रायव्हेट पार्टजवळ भाजल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मुलावर अत्याचार करणारी महिला ही त्याच्या वडिलांची प्रेयसी असल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
मंगळवारी एका आठ वर्षांच्या मुलाला वेल्लोरमधील एका पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. तिथे मुलाने त्याच्या वडिलांच्या मैत्रिणीने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. महिलेने त्याच्या पाठीवर आणि प्रायव्हेट पार्टजवळ चटके देऊन दुखापत केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
मुलाच्या आईची आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, सेत्तू (35) नावाच्या व्यक्तीचे ईश्वरीशी लग्न झाले होते. त्यांना दहा आणि आठ वर्षांचे दोन मुलगे आहेत. चार महिन्यांपूर्वी ईश्वरीने आत्महत्या केली होती. यानंतर सेतू आणि शेजारी राहणारी महिला वेणी एकाच घरात एकत्र राहू लागली.
मावशीला सांगितला घडलेला प्रकार
मंगळवारी सेत्तूचा आठ वर्षांचा मुलगा घरातून पळून गेला आणि मावशीकडे पोहोचला. त्याच्या पाठ, हात, पाय आणि खाजगी अवयवांजवळ भाजल्याच्या जखमा पाहून मावशी आश्चर्यचकित झाली. तिने विचारल्यावर, मुलाने सांगितले की बाबांची मैत्रीण वेणीने आपल्याला चटके दिल्यामुळे या जखमा झाल्या आहेत. यानंतर आठ वर्षीय मुलाला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले, जिथे पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.
उत्तर प्रदेशात महिलेची बालकाच्या लैंगिक अवयवावर लाथ
दुसरीकडे, अल्पवयीन मुलाशी छेडछाड केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये काही दिवसांपूर्वी घडल्याचं समोर आलं होतं. बालकाच्या लैंगिक अवयवावर लाथ मारुन दुखापत केल्याचा महिलेवर आरोप झाला होता. धक्कादायक म्हणजे उलट बालकाविरोधातच तक्रार करण्याचा पवित्रा महिलेने पोलीस स्टेशनला जाऊन घेतला. मात्र आयजींनी बेड्या ठोकून तिची रवानगी तुरुंगात केली.
पीडित अल्पवयीन मुलगा आरोपी नेहाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तिने त्याच्यासोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली. त्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी नेहाविरोधात छेडछाड आणि अन्य कलमांच्या अंतर्गत तक्रार नोंदवली होती.
संबंधित बातम्या :
अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली, महिलेला अटक
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, प्रचंड मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न