चेन्नई : धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हा खूप गंभीर गुन्हा आहे. महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी वेगवेगळी पावल उचलली आहेत. पण तरीही महिलांवर अत्याचार सुरुच आहेत. पोलिसांनी सर्वच्या सर्व 7 आरोपींना अटक केली आहे. 9 मार्चला पीडित मुलगी तिच्या गावी गेली होती. वीराकुमारस्वामी मंदिरातील रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी मुलगी गेली होती. त्यावेळी तिचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तामिळनाडू वेल्लाकोवीलमध्ये ही घटना घडली.
मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन तामिळनाडू पोलिसांनी दोन स्पेशल टीम्स बनवल्या. एका टीमने कामराजपूरम येथून 32 वर्षीय आणि दुसऱ्या 29 वर्षीय आरोपीला अटक केली. या दोन आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावरुन अन्य आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली. सदर प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
किती वर्ष जुन मंदिर?
वीर कुमारस्वामी मुरुगन मंदिर कोंगु मंडलम प्राचीन मंदिरापैकी एक आहे. या स्थानाला “वेल्लाइकोविल” ऊर्फ वेल्लाकोइल म्हटलं जातं. हे मंदिर थिरुप्पुर जिल्ह्याच्या करूर-कोवईच्य मुख्य रस्त्यावर वेल्लाकोविल शहरात आहे. मंदिर जवळपास 600 वर्ष जुन असून. रथोत्सवात मोठ्या संख्येने भाविक येतात.