Crime: भयानक, पतीच्या अत्याचारांनी भडकली होती बायको, केली हत्या आणि मग अवयवांना बिर्याणीसारखे शिजवले

| Updated on: Aug 21, 2022 | 8:49 PM

तेहरानच्या एस्लामनगरमध्ये हा ह्रद्य चिरणाचा प्रकार करणारी तरुणी 22 वर्षांची असल्याचे सांगण्यात येते आहे. या तरुणीने पोलिसांसमोर आपला गुन्हाही कबूल केल्याची माहिती आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, 15 वर्षांची असताना या तरुणीचा विवाह जबरदस्तीने तिच्या नवऱ्याशी करण्यात आला. 13 ऑगस्ट रोजी या तरुणीला अटक करण्यात आली आहे.

Crime: भयानक, पतीच्या अत्याचारांनी भडकली होती बायको, केली हत्या आणि मग अवयवांना बिर्याणीसारखे शिजवले
तेहरानमध्ये भयंकर प्रकार उघड
Image Credit source: social media
Follow us on

तेहरान – हत्या करुन, मृत व्यक्तींच्या अवयवांना कुणी शिजवून खाल्ले तर.. तुमचा विश्वास बसणार नाही ना. हे ऐकूनच एखाद्याच्या काळजाचं पाणी पाणी होईल. एखाद्या सिनेमात किंवा टीव्हीवरच्या एखाद्या क्राईम शोमध्ये हे पाहायला मिळेलही. आपल्या देशातही असे प्रकार समोर आले आहेत, ज्यात पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. मात्र मृत माणसाला (cooked dead body) शिजवून खाणे ही कल्पनाच भयावह आहे. मात्र प्रत्यक्षात ही घटना घडली आहे ती ही इराणमध्ये. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रत्येकाला धक्का बसलाय. हे सगळे प्रकरण घडले ते इराणच्या राजधानी तेहरानच्या (Tehran)एस्लामशहर परिसरात. या ठिकाणी एका संतापलेल्या बायकोने तिच्या नवऱ्याला नुसते ठारच केले (wife killed husband)नाही. तर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन तिने त्याचे अवयव शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जबरदस्तीने झाला होता विवाह

तेहरानच्या एस्लामनगरमध्ये हा ह्रद्य चिरणाचा प्रकार करणारी तरुणी 22 वर्षांची असल्याचे सांगण्यात येते आहे. या तरुणीने पोलिसांसमोर आपला गुन्हाही कबूल केल्याची माहिती आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, 15 वर्षांची असताना या तरुणीचा विवाह जबरदस्तीने तिच्या नवऱ्याशी करण्यात आला. 13 ऑगस्ट रोजी या तरुणीला अटक करण्यात आली आहे.

नवऱ्याच्या मृतदेहातील अवयव शिजवले

पोलिसांना या तरुणीच्या नवऱ्याचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. त्यानंतर या तरुणीला अटक करण्याची कारवाई करण्यात आली. या महिलेने तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले होते. त्यानंतर एका भांड्यात तिने हे अवयव शिजवले. जेव्हा याची दुर्गंधी आजूबाजूला पसरण्यास सुरुवात झाली. तेव्हा शेजारच्यांनी या प्रकाराची तक्रार पोलसांकडे केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यावर, तो प्रकार पाहून त्यांनाही धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत नंतर इराणच्या माध्यमांसमोर मांडला आहे.

हे सुद्धा वाचा

पती चाकू घेऊन मारण्यासाठी आला होता

इराण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची माहिती होती. तिने स्वताच्याच घरात या दोघांना एकत्र पकडलेही होते. हा विवाह जबरदस्तीने करण्यात आला असल्याने, तिचा पती या तरुणीकडे दुर्लक्ष करीत होता. ही तरुणी नवऱ्याच्या अशा वागण्यामुळे प्रचंड त्रासलेली होती. हा नवार दररोज तिला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीला मारहाण करीत असे. तसेच तिच्या पतीचे इतरही अनेक महिलांशी संबंध असल्याचे तिला समजले होते. तिने त्याला रंगेहात पकडल्यानंतर ती महिला निघून गेली. त्यानंतर या दोघा पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणात तिचा पती तिच्या अंगावर चाकू घेऊन धावला होता.

पतीलाच विचारले कसे मारायचे

या भांडणात ही तरुणी पतीला म्हणाली की, जर पती तिची फसवणूक करत असेल तर त्याने तिचा जीवच घ्यावा. म्हणजे त्याला काहीही करण्याची सूट मिळेल. तिने पतीला हेही विचारले की आपल्याला कसे मारशील. त्यावर पतीनेही संतापून तुझ्या पोटात चाकू खुपसेन असे सांगितले होते. त्यानंतर तिने पतीच्या हातातून चाकू हिसकावून घेतला आणि त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर या तरुणीने पतीला सांगितले की बघ, आता तुझा जीव कसा घेते ते. हल्ला केल्यानंतर पती बेशुद्ध होऊन जमिनीर पडला होता. त्यानंतर तिने त्याच्या शरिराचे तुकडे केले आणि ते शिजवले. या तरुणीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र आता जेलमध्ये असताना आपल्या मुलीच्या भविष्याचे काय, हा प्रश्न तिला सतावतो आहे.