नाशिक – अनेकदा सुसाट गाड्या पळवल्याचे आपण पाहतो, पण अशावेळी समजा गाडीचं नियंत्रण सुटलं तर काही होऊ शकतं, असा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. अशी एक घटना नुकतीच नाशिकमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. सुसाट आलेली कार गोल फिरून नाशिकमधील (nashik) निफाड रस्त्याजवळ (nifhad road) असलेल्या किराणा मालाच्या दुकानात घुसली असल्याचा व्हिडीओ सीसीटिव्हीत (CCTV video) कैद झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी चक्क एखाद्या चित्रपटातल्या सीन सारखी गोल फिरली आणि थेट दुकानात घुसली. दुकानातलं ग्राहक आणि दुकानदाराने प्रसंगावधान पाळत घटनास्थळावरून पळ काढला. झालेल्या घटनेत कोणत्याही जीवीतहानी झालेली नसून गाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मद्यधुंद अवस्थेत सुसाट आल्याने झाला अपघात
नाशिकमध्ये घडलेल्या अनेक घटना आपण अनेकदा चित्रपटात पाहतो. पण अनेकदा अशा गोष्टी होतात, परंतु त्या आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. झालेली घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याने ती आपणास पाहावयास मिळालेली आहे. तसेच जी कार बेधुंद अवस्थेत आली होती. त्यामुळे इतर कोणत्याही गाड्यांचे नुकसान झालेले नाही. दुकानदार आणि ग्राहकाने चक्क तिथून पोबारा केल्याचे पाहायला मिळत आहे. चालकाने प्रचंड मद्य घेतले असल्यामुळे त्याच्याकडून गाडीचा ताबा सुटला त्यामुळे हा अपघात घडला असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
पोलिसांची चालकावर कारवाई
संबंधित घटना घडल्यानंतर नजीकच्या किंवा ज्या पोलिसांच्या हद्दीत हे हा अपघात येतोय. तिथल्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गाडी ताब्यात घेतली आहे. तसेच गाडीचालकालाही ताब्यात घेतलं आहे. गाडीचं आणि दुकानाचं प्रचंड नुकसान झालं आहे. आता पोलिस चालकावरती कोणता गुन्हा दाखल करतील हे पाहण गरजेचं आहे. तसेच अनेकदा गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर अशी प्रकरणं घडत असतात. परंतु सद्या झालेल्या घटनेत चालक पुर्णपणे बेधुंद अवस्थेत आढळला आहे.
दुकानदार पळाला
गाडी दुकानाकडे येतं असल्याचे दिसताचं दुकान मालकाने दुकानातून उडी घेऊन बाहेर पडला, समजा गाडी पुढे अजून सरकली असती. तर दुकानादाराच्या अंगावर गेली असती. तसेच त्यावेळी दुकानात असलेलं गि-हाईक सुध्दा गाडीपाहून पळाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.