Theft | मानलं गडे पट्ट्यांना! अगोदर शाळेत चोरी, नंतर थेट पोलिसांना आवाहन, वाचा नेमके काय घडले…

| Updated on: Jul 04, 2022 | 3:12 PM

चोरट्यांनी चोरीनंतर बोर्डवर एक नंबर देखील लिहिला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा फोन नंबर शाळेतील एका शिक्षकाचाच आहे. या चोऱ्यांकडे शाळेतील शिक्षकांचा नंबर नेमका कसा आला आणि या चोरीशी शिक्षकाचा काय संबंध आहे. याबाबतचा संपूर्ण तपास पोलिस करतांना दिसत आहेत.

Theft | मानलं गडे पट्ट्यांना! अगोदर शाळेत चोरी, नंतर थेट पोलिसांना आवाहन, वाचा नेमके काय घडले...
Follow us on

ओडिशातील (Odisha) नबरंगपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. या प्रकरणानंतर पोलिसांची झोपच उडालीयं. इंद्रावती हायस्कूलमधील चोरी (Theft) आता चर्चेचा विषय ठरला आहे. चोरट्यांनी शाळेतील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन व इतर वस्तू पळवून नेले. यासोबतच चोरांनी ब्लॅक बोर्डवर ‘इट्स मी धूम 4’ असे लिहिले आहे. एवढंच नाही तर पोलिसांना (Police) आव्हान देत लिहिले आहे की, तुम्हाला शक्य असेल तर पकडून दाखवा. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 July 2022-tv9

ब्लॅक बोर्डवर मजकुर लिहून थेट पोलिसांनाच आव्हान

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शाळेचा शिपाई शाळेत आल्यावर मुख्य गेटचे कुलूप तुटलेले दिसले. यासोबतच एका खोलीतून संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन आदी वस्तू चोरीला गेल्याचे शिपायाच्या लक्षात आले. शिपायाने या घटनेची संपूर्ण माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शाळेच्या ब्लॅक बोर्डवर मजकुर लिहून थेट पोलिसांनाच आव्हान देण्यात आले.

हे सुद्धा वाचा

चोरांनी लिहिला शिक्षकाचाच नंबर बोर्डवर

चोरट्यांनी चोरीनंतर बोर्डवर एक नंबर देखील लिहिला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हा फोन नंबर शाळेतील एका शिक्षकाचाच आहे. या चोऱ्यांकडे शाळेतील शिक्षकांचा नंबर नेमका कसा आला आणि या चोरीशी शिक्षकाचा काय संबंध आहे. याबाबतचा संपूर्ण तपास पोलिस करतांना दिसत आहेत. मात्र, शाळेतील अशाप्रकारच्या चोरीनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितली महत्वाची माहिती

नबरंगपूरचे एसपी एस सुश्री म्हणाले की, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. मात्र, चोरीच्या वस्तूंबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. घटनास्थळी तपास करून स्थानिक पोलीस स्निफर डॉगच्या सहाय्याने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चोर कितीही हुशार असला तरी तो पोलिसांपासून सुटू शकत नाही. आम्ही या घटनेचा तपास करत असून लवकरच चोरांना जेरबंद केले जाईल.