भंडारा : दारुच्या दुकानाचे (Theft) कुलूप तोडून दीड लाख रुपयाची रक्कम चोरी केल्याची धक्कादयक घटना घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली आहे. 31 जानेवारीच्या रात्री ही चोरी झाली आहे. या चोरीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून दुकानदाराच्या तक्रारीवरुन पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हरी मांढरे (30) रा. मासळ असे घटनेतील तक्रारकर्त्या देशी दारु दुकान चालकाचे नाव आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद करण्यात आली आहे. मांढरे यांनी चोराचा शोध लावून चोरी झालेली रक्कम परत मिळवून देण्याची विनंती पोलिसांना केली आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात चोरी, लूट, तसेच मारहाणीच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे कायदा तसेच सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानंतर आता चोरीची ही घटना घडलीय.
मासळ येथील देशी दारुच्या दुकानाच्या चालकाने दारुची विक्री करुन सुमारे 1 लाख 56 हजार रुपये दुकानातील लाकडी पेटीत ठेवले. तसेच रात्र झाल्यामुळे दुकान बंद करुन दुकानाचा मालक घरी निघून गेला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास देशी दारु दुकानाच्या प्रमुख दाराचे कुलूप तोडले. तसेच दुकानात प्रवेश करुन संपूर्ण रक्कम चोरून नेली. चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात झाला आहे.
पाहा व्हिडीओ :
भंडारा जिल्ह्यात अशा प्रकारे चोरी चोरट्यांनी दारुच्या दुकानावर डल्ला मारला. या चोरीत चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपये चोरून नेले..@TV9Marathi #THIEF pic.twitter.com/mHBMti3wRh
— prajwal dhage (@prajwaldhage100) February 2, 2022
हा प्रकार घडल्यानंतर दुकानाच्या मालकाने पोलिसांत धाव घेतली आहे. तसेच चोरांनी पळवलेली रक्कम शोधून देण्यासाठी त्याने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दाखल तक्रारीनुसार तपास सुरु केला असून लवकरात लवकर चोरांना पकडण्याचे आश्वासन दिले आहे.
इतर बातम्या :
आंघोळीनंतर नदीकिनारी बसलेल्या तिघांवर काळ कोसळला, विजेची तार पडून जागीच गतप्राण
भंडाऱ्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कॉलेजमधून घरी येऊन उचललं धक्कादायक पाऊल