भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणात गेल्या तीन दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिले आहे. या धरणाला 33 दरवाजे असून सध्या होत असलेल्या पावसामुळे 9 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून जवळपास 1 हजार 124.55 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात अशाप्रकारे पाण्याचा विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.