परभणी : सोमवार अपघातवार ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी रात्री पुणे-नगर महामार्गावर झालेल्या अपघातानंतर आणि परभणीतून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. कॉलेजमध्ये जात असताना तिघा भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ तर एका चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. जिंतूर (Jintur) शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला. खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचं सांगितलं जातंय. या अपघातात मृत्यू झालेली तिघंही भावंड ही जिंतूरच्या मालेगाव इथली रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे. अकोली शिवारातील रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. या अपघातानं मृत भावंडांच्या (Three Brothers Killed in an Accident) कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यातील वाढते रस्ते अपघात (Road Accident) सध्या चिंतेचा विषय ठरत असून अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नसल्याचं परभणीतील या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.
परभणी जिल्ह्यात अनेकदा खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचं वारंवार समोर आलं आहे. अशातच आज पुन्हा एकदा खड्डा चुकवण्याच्या नादात तिघा तरुणांचा अपघातात जीव गेला असल्याचं बोललं जातंय. परभणी जिल्ह्यात आजपासून महाविद्यालयं सुरु झाली आहेत. दरम्यान, महाविद्यालयात जाण्यासाठी 18 वर्षीय अभिषेक म्हेत्रे आपल्या 15 वर्षीय योगेश म्हेत्रे या सख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरीता चालला होता. यावेळी आपला चुलत भाऊ रामप्रसाद म्हेत्रेदेखील सोबत होता
दुचाकीवर जात असतांना जिंतूर शहरापासून 3 किमीच्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर असलेल्या खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकी- ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तिघाही भावंडाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना समोर आली आहे. जागीच या तिघांचाही अपघातात जीव गेला.
मयत तिन्ही भावंडं जिंतूच्या मालेगाव येथील रहिवासी असून या ही घटना कळताच गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
गेल्या 24 तासांत रस्ते अपघातात राज्यात एकूण आठ बळी गेलेत. परभरणीतील अपघातात तीन तर पहाटे पुणे-नगर मार्गावर झालेल्या अपघातातही पाच जणांचा मृ्त्यू झालाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री तीन वाहनांत भीषण अपघात झाला. ट्रक, टी व्हिलर आणि फोर व्हिलर एकमेकांवर आदळल्याने ही गटना घडली. या दुर्घटनेत एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुणे-नगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar) शिक्रापूर येथे हा भीषण अपघात (Accident) घडला होता.
इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, यंत्रमाग कारखानाही आगीच्या भस्मस्थानी
एवढा भीषण अपघात पाहिला नसेल… रस्त्याच्या कडेच्या गार्डमध्ये घुसली कार आणि…