धक्कादायक विकृती, सापाला पकडून त्याचं डोक चावलं, घटनेच व्हिडिओ रेकॉर्डिंग

| Updated on: Apr 06, 2023 | 11:41 AM

माणसात इतकी विकृती कुठून येते?. खरंतर पर्यावरणासाठी वन्यजीवांचा सांभाळ करण्याची आवश्यकता आहे. पण कधीकधी माणसाला याचा विसर पडतो. तो वन्य जीवांची काळजी घेण्याऐवजी त्यांना त्रास देतो.

धक्कादायक विकृती, सापाला पकडून त्याचं डोक चावलं, घटनेच व्हिडिओ रेकॉर्डिंग
Three men in Tamil Nadu held for biting off snakes head
Image Credit source: (Photo: Facebook/Wildlife & Nature Conservation Trust)
Follow us on

Wildlife Animal cruelty : पर्यावरणाच्या योग्य संतुलनासाठी वन्य जीव महत्वाचे आहेत. त्यामुळे वन्य जीवांची काळजी घेतली पाहिजे. पण काहीवेळा माणसाला याचा विसर पडतो. ते वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात घुसखोरी करतात. त्यांना हानी पोहोचवतात. अशीच माणसामधील एक धक्कादायक विकृती समोर आली आहे. ते फक्त साप पकडून थांबले नाहीत. त्यांनी सापाच डोकं सुद्धा चावलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा प्रकार पर्यावरवाद्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाला याची माहिती दिली.

त्रास देऊन हत्या

तामिळनाडूच्या रानीपेटमध्ये त्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. मोहन, सूर्या आणि संतोष अशी तीन आरोपींची नावं आहेत. तिघेही काईनूरचे रहिवासी आहेत. त्यांनी सापाला त्रास दिला. त्याची हत्या केली. महत्वाच म्हणजे त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवला.

‘मी याचा बदला घेणार’

व्हिडिओमध्ये मोहनने हातामध्ये साप पकडल्याच दिसतय. साप माझ्या हाताला चावला, मी याचा बदला घेणार असं मोहन व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय. अन्य दोघे त्याला सापाला सोडून देण्याच आवाहन करत असताना तितक्यात मोहन सापाच डोकं चावतो. व्हिडिओ संपताना तिघेही मोठमोठ्या हसताना दिसतात. सापाच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असताना, त्याचं धड शीरावेगळ झाल्याच व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित आरोपींना अटक केली. आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून प्राण्यांबरोबर क्रूर वर्तन करुन त्यांची हत्या केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवलाय.