पाटणा : बिहारच्या छपरा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. छपरा येथील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. संबंधित व्हिडीओत काही नराधम एका महिलेला छळत आहेत. महिला दुचाकीवर मागच्या सीटवर बसली आहे. यावेळी आरोपी तिला छळण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हे संतापजनक कृत्य करत असताना आरोपींपैकी एकाने या विकृत चाळ्यांचा व्हिडीओ देखील बनवला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित घटना ही दरियापूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. ही घटना खरंतर दोन आठवड्यांपूर्वीची आहे. काही नराधमांनी पीडित महिलेला एका पुरुषासोबत जंगलात बघितलं होतं. तिथे आरोपींनी त्यांना घेरत त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलं. आरोपींनी त्यांना मारहाणही केली. यादरम्यान पीडित महिला आणि पुरुष हे कसंतरी आरोपींच्या तावडीतून सुटले आणि दुचाकीने जाऊ लागले. यावेळी सुद्धा आरोपींनी अश्लील कृत्य केलं.
संबंधित व्हिडीओला आरजेडीचे मीडिया इंचार्ज अरुण कुमार यादव यांनी शेअर केला आहे. “बिहारच्या छपरा जिल्ह्यात ही अमानवीय घटना घडली आहे. बिहारमध्ये बिहार-भाजपच्या गठबंधनचे गेल्या 15 वर्षांपासून सरकार आहे. तसेच नितीश सरकरमधील ही पहिली घटना नाही. राज्यात नेहमी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. नितीश सरकार महिला सुरक्षेत कमी पडताना दिसत आहे. सरकार लाज वाटू द्या”, असं अरुण कुमार यादव म्हणाले.
तसेच काँग्रेस नेते चंदन यादव यांनी देखील ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओ बिहारच्या छपरा जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. बिहारमध्ये महिलांचं जगणं कठीण होऊन बसलं आहे, असं चंदन यादव म्हणाले आहेत. दरम्यान, संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या प्रकरणी 6 जणांची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यात नुकतंच एक संताजनक घटना समोर आलीय. सातारा शहरातील एका उपनगरात एका 12 च्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नराधम काका दिली होती. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून फरार आरोपी काकाचाही कसून शोध घेत आहेत.
दुसरीकडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.
हेही वाचा :
माकडामुळे माणसाचा मृत्यू, पाच लहान मुलांसह-पत्नी पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सावधान ! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय? बनावट ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून रहा सतर्क