सातारा – साताऱ्यातील (SATARA) केंजळ गावच्यानजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने (BIKE) मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये गोगावलवाडी (GOGAWALWADI) येथील युवक जागीच ठार झाला आहे. युवकाचे नाव शैलेश बाळाराम गोगावले वय 23 असे आहे. हा तरूण गुरुवारी रात्री मेढ्याहून आपल्या गावाकडे होळीसाठी निघाला होता. मोटारसायकल केंजळ नजीक आली असता सातारा-मेढा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोरदार दुचाकीसह धडक बसली. या जोरदार धडकेत युवक हा दुचाकीसह ट्रॉलीच्या उसात अडकला. त्यावेळी तिथं असणाऱ्या अनेकांनी हा अपघात पाहिला. तसेच गाडीसह उसाच्या ट्रॉलीत अडकलेल्या तरूणाला पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळलं. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
टॅक्टर वाटेत लावल्याने अपघात
गळीप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसाची वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्यांचे अपघात होतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना कायमचं अपंगत्व आलं आहे. त्यामुळे ऊसाच्या गाड्यांपासून अनेकजण चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. काल होळीसाठी बाईकवरून निघालेल्या तरूणाच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका विचित्र होता, की तरूणाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. रस्त्यात ट्रॅक्टर उभा असल्याने हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कारण ऊस वाहतूकीची गाडी रस्त्यात उभी असल्यास समोरून येणारं वाहन दिसत नाही. त्यामुळे ऊसाची गाडी पुढे असेलतर अनेकजण काळजी घेतात. झालेला अपघात येवढा भीषण होता की शैलेश हा जागीच ठार झाला.
काहीकाळ तणावाचे वातावरण
अधिक रात्र झाल्याने घरच्यानी शैलेशच्या मोबाईलवरती कॉल केला. त्यावेळी घरच्यांना शैलेशचा अपघात झाला असल्याची माहिती समजली. अपघाताची माहिती मिळताच शैलेशच्या घरचे आणि ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली.ग्रामस्थानी ट्रॅक्टर मालकास आमच्या हवाली करा असे सांगितल्यावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर वातावरण निवळलं आहे. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे गुरुवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. शैलेशच्या पश्चात आई-वडील व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.