भोपाळ : माणूस दुर्बळ किंवा निराधार असला की तो सोपा टार्गेट असतो. कधी दुर्बळांना भावनिक साद देवून त्यांची मतं वळवता येतात. तर कधी त्यांना छळून, मारहाण करुन दहशत माजवता येते. अनेकदा हे असं सगळं खोटं आहे, असं दाखवलं जातं. पण काही घटना समोर येतात आणि पुन्हा माणुसकीला काळीमा फासली जाते. नाही म्हणजे खूप चांगल्या घटनाही घडतात. दुर्बळ माणसं मुख्य प्रवाहातही प्रचंड प्रमाणात येतात. ते सुदृढ होतात. पण जे अद्यापही दुर्बळ आहेत त्यांचं काय? हा सवाल उपस्थित करायला भाग पाडणारी एक घटना आज समोर आली आहे. मध्यप्रदेशात एका आदिवासी व्यक्तीला फक्त चोरीच्या संशयावरुन प्रचंड मारहाण करण्यात आली. त्याचा जीव जाईपर्यंत शोषण करण्यात आलं.
मध्यप्रदेशातून एक व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओत जे दिसतंय ते सुन्न करणारं आहे. याशिवाय माणसं इतकं निर्घूणपणे कसं वागू शकतात? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओची दखल मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी देखील घेतली आहे. त्यांनी ट्विट करत या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
ये मध्यप्रदेश में हो क्या रहा है…?
अब नीमच ज़िले के सिंगोली में कन्हैयालाल भील नाम के एक आदिवासी व्यक्ति के साथ बर्बरता की बेहद अमानवीय घटना सामने आयी है ?
मृतक को चोरी की शंका पर बुरी तरह से पीटने के बाद उसे एक वाहन से बांधकर निर्दयता से घसीटा गया, जिससे उसकी मौत हो गयी ? pic.twitter.com/96r1zUQBDs
— Kamal Nath (@OfficeOfKNath) August 28, 2021
संबंधित घटना ही नीमच जिल्ह्यातील सांगोली पोलीस ठाणे क्षेत्रात घडली आहे. काही नराधमांनी कान्हा उर्फ कन्हैया भील या व्यक्तीला चोरीच्या संशयावरुन प्रचंड मारहाण केली. विशेष म्हणजे ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. आरोपींनी कान्हा यांच्या पायाला दोरीने बांधलं. त्यानंतर त्यांना एका पिकअप गाडीला बांधून सरपटत नेलं. यावेळी कान्हा खूप गयावया करत होते. आरोपींच्या पाया पडत होते. पण आरोपींना त्यांची जराही दया आली नाही. आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ देखील बनवला. त्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर ज्या व्यक्तीला अशा अमानुषपणे वागणूक दिली गेली त्याचा मृत्यू झाला आहे.
पीडित व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेत मृतक कान्हा यांना न्याय मिळावा यासाठी अनेकांनी मागणी केली आहे. संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीदेखील तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या हाती आरोपींची माहिती मिळाली. आठ जणांनी मिळून हे कृत्य केल्याचं पोलिसांना माहिती पडलं. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर चार जणांचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष ज्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत त्यापैकी महेंद्र गुर्जर हा आरोपी एका सरपंच महिलेचा पती आहे. पोलिसांनी क्रूर कृत्य करण्यात आलेली पिकअप गाडी देखील जप्त केली आहे. तसेच आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या मुसक्य़ा आवळल्या, चालत्या रिक्षात तरुणीला छेडणं महागात
जड अंतकरणाने त्यांनी पोटच्याच मुलांचा गळा चिरला, मन हेलावून टाकणारी घटना