मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह, एसी यापूर्वीच घेतलं असेल, तर तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल. एवढं चांगलं साहित्य ते देखील फक्त ५० हजार रुपयात मिळतंय. ते तुम्हाला आधीच का कुणी सांगितलं नाही, आता झालं ते झालं, पण फक्त ५० हजार रुपयात हे सामान ते देखील घरच्या घरी बसून मिळत असेल तर काय वाईट आहे का? तुम्हाला नसेल उपयोगाचं तर एखाद्या नातेवाईकाला मी देऊन टाकेन, असं तुमच्या मनात नक्कीच आलं असेल. पण ही बातमी संपूर्ण वाचा, यात तुमचे आणखी भविष्यात ५० हजारापासून ५ लाखांपर्यंतची बचत होणार आहे, बचत नाही तुमचे पैसे वाचणार आहेत. कसे ते पुढे वाचा.
तुम्हाला फेसबूक मॅसेंजरवर तुमच्या जवळच्या मित्राकडून मेसेज येईल, तो तुम्हाला हाय बाय करेल, यानंतर तुमचा मोबाईल नंबर मागेल. मग काही वेळाने तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येईल. यानंतर तुम्हाला वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह, एसी यांचे फोटो येतील. तुम्हाला त्याच नंबरवरुन फोन येईल आणि विचारलं जाईल, सरजी मी तुमच्या त्या मित्राचा मित्र आहे.(ज्या मित्राच्या मेसेंजरवरुन त्याने तुमचा नंबर मागितला होता) तुम्हाला मी जे फोटो पाठवले आहेत, ते तुम्ही फक्त ५० हजार रुपयात खरेदी करु शकतात. या माझ्या घरच्या वस्तू आहेत, या मी महिनाभर देखील वापरलेल्या नाहीत, पण आता माझी ट्रान्सफर झाली आहे. तुम्ही पुण्यात राहत असाल, तर तो सांगेन मी मुंबईत सीआरपीएफ कॅम्पला राहतो, माझी मुंबईहून दिल्लीला बदली झाली आहे. पुढे आणखी वाचा तुमचे ५० हजार ते ५ लाख कसे वाचतील.
तो सांगेल माझी मुंबईहून दिल्लीला बदली झाली आहे, आणि मी सीआरपीएफमध्ये ऑफिसर आहे, तुम्हाला हे सामान भारतात तुमच्या घरी कुठेही घरपोहच मिळेल. तुम्हाला तो इंडियन आर्मी आणि सीआरपीएफचा जवान आहे असं सांगतोय, त्यावरुन तुमचा नक्कीच विश्वास बसलेला आहे, मी दिल्लीला एवढं सामान घेऊन जावू शकत नाही, म्हणून मी जवळच्या व्यक्तीला हे फक्त ५० हजारात देऊन टाकतोय, तो जवळचाच असला पाहिजे, कारण मी दुसऱ्याला ५० हजारात एवढं सामान देणार नाही. तुम्ही मुंबईत नातेवाईकाला हे सामान पाहण्यासाठी पाठवतो असं सांगितलं, तर तो सांगेल, आमच्या कॅम्पमध्ये कॉमन मॅनला येण्याची परमिशन नाही.
तुम्हाला हे सामान घ्यायचं आहे किंवा नाही हे लवकर सांगा, असं तो सांगेल, यावरुन तुम्हाला वाटेल, तो घाई करतोय, तो दुसऱ्या व्यक्तीला हे सामान देऊन टाकू शकतो, म्हणून तुम्ही त्याचा नंबर मागून पैसे व्हॉटस अप नंबरवर पाठवून द्याल, त्याच्या व्हॉटसअप प्रोफाईलला सैन्य दलातील एका तरुण ऑफिसरचा फोटो असेल. तुम्ही ५० हजार पाठवल्यानंतर लवकरच तुमच्या पत्त्यावर सामान पोहोचेल, असं तो फोनवर सांगेल. तुम्ही आणखी एकदा ते फोटो पाहणार, जे त्याने तुम्हाला व्हॉटसअपवर पाठवले होते. तुम्ही विचार करणार हे सामान नेमकं कुठे ठेवायचं घरात, यानंतर आणखी तो काही ना काही सांगून तुमच्याकडून पैसे मागू शकतो, किंवा तुमच्या नंबरवर ओटीपी पाठवून, तो मागून आणखी पैसे तुमच्या अकाऊंटवरुन घेऊ शकतो.
पण तुम्ही हे फोटो गूगल रिव्हर्स इमेलजा टाकले तर तुम्हाला लक्षात येईल, एक-एक फोटो हा वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन कॉपी केला आहे, आणि तोच आपल्याला पाठवला आहे. यात प्रकरणात तुम्हाला फक्त घरातील सामान दाखवून फसवण्यात आलं असेल, पण कधी स्कूटर, कधी फोर व्हिलर यांचे फोटो लावूनही तुम्हाला फसवलं जावू शकतं. म्हणून गुगल रिव्हर्सचा वापर करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही बातमी नक्कीच व्हॉटसअपवर शेअर करा, त्यांचे ही कष्टाचे पैसे नक्कीच वाचतील.