बुलढाणा – बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात काल सायंकाळी आलेल्या पावसाने कहर केला आहे. सिंदखेड राजा, लोणार, चिखली , मोताळा , शेगांव तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चिखली (Chikhali) तालुक्यातील शेळगाव, अंचारवाडी, देऊळगाव घुबे भागात तर भागात तर नदी नाले पुन्हा तुडुंब वाहू लागले आहेत. तर सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पावसात कडकडाट आंनी वीजांचा कहर झाल्याने साठेगाव येथील रुख्मिनाबाई गजानन नागरे, वय 50 वर्षे ह्यांचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीत तर त्यांचे पती गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले. दोघे पती पत्नी शेतात काम करत होते. मोताळा (Mothala) तालुक्यात रिधोरा येथेही वीज पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बहुतांश गावात काल सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला होता. सावरगाव तेली येथे जोरदार पाऊस पडल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे गावाचा संपर्क काही तासांसाठी तुटलेला होता. त्यामुळे शेतात काम करणारे मजूर तसेच शाळेतील विद्यार्थी पुलावर अडकून पडले होते. सावरगाव तेली येथिल पुल हा लहान असल्याने अनेकदा हा पुल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे नेहमीच याठिकाणी पूर आल्याने रस्ता बंद होता. अनेक वर्षांपासून नविन पुलाची मागणी गावकरी करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सावरगाव तेली येथिल नागरिक आता संतप्त झाल्याचे दिसून येत आहेत.
राज्यात कालपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल बुलढाणा जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. एका घटनेत महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर एक घटनेत दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. कारण आत्तापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक धरणं भरली आहेत.