गणेश सोळंकी, बुलढाणा : उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे सुट्टी अनेकजण जात असतात. त्याचवेळी तिथं अनेकदा कार्यक्रम असतात. बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील दोन मुली पुणे येथील खडकवासला धरणाच्या (khadakwasal damp) बॅक वॉटर असलेल्या नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या मुळ गावच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. सध्या रोज पाण्यात मुलं बुडाल्याच्या घटना घडत आहेत. मागच्या आठदिवसात महाराष्ट्रात अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्या दोन मुली बुडाल्या त्या मामाकडे लग्न आणि बारश्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. ही घटना तात्काळ तिथल्या जवळच्या पोलिसांनी (pune police) सांगितली, त्याचबरोबर अग्नीशामक दलाला सुध्दा दिली.
बुलढाणा जिल्ह्याच्या दोन लेकींचा पुणे येथील खडकवासला धरणाच्या बॅक वॉटर असलेल्या नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे बुलढाणा परिसरात ही शोककळा पसरली. या घटनेत एकीचा पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या ८ जणी बुडू लागल्या होत्या. त्यापैकी ७ मुलींना वाचवण्यात स्थानिकांना यश आल आहे. तर दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या मुलीचं नावं खुशी संजय खुर्दे (१३ वर्ष) राहणार बुलडाणा आणि शीतल भगवान टिटोरे , वय १८ वर्ष , राहनार झरी, अशी नावे आहेत.
या दोघीही मृतक नात्याने आते मामे बहीण लागतात. मृतक या त्यांच्या नातेवाईकाकडे लग्न आणि बारशाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या. बुलडाण्यावरून खडकवासला येथे गेलेल्या ९ मुली तसेच काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यापैकी एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली, तिला वाचवण्यासाठी आठ जणी धावल्या, त्याही बुडाल्या, यावेळी मुलीच्या किंकाळ्या एकूण परिसरातील लोक तिथे धावले. यावेळी ७ जणींना वाचवण्यात यश आले, मात्र दोघींना जलसमाधी मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा परिसरात शोककळा पसरली आहे.