नवी मुंबई : पुणे मुंबई लेन एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कारने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने कारमधील दोघांचा मृत्यू (Death) झाला असून, चालक जखमी झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण (Control) सुटल्याने कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. याप्रकरणी कारचालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती मुंबईतील अंधेरी परिसरातील रहिवासी आहेत. गोव्याहून मुंबईला परतत असताना त्यांच्या गाडीला दुर्दैवी अपघात (Accident) घडला. मयतांची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस त्यांची माहिती घेत आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे.
मृत व्यक्ती मुंबई अंधेरी येथील रहिवासी आहेत. सुट्टीनिमित्त ते गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. बुधवारी गोव्याहून मुंबईला घरी परतत होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने कारने घरी जात होते. यावेळी पुणे मुंबई लेन एक्सप्रेस वे वर कळंबोली ब्रिजवर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला. तर कारमध्ये बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत असलेल्या कार चालकावर खांदेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरीवलीत पश्चिम द्रुतगती मार्गावर डंपरने बाईकला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डंपरचालकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मयत जोडपे बुधवारी दुपारी पश्चिम द्रुतगती मार्गावरुन मीरा रोडच्या दिशेने चालले होते. यादरम्यान डंपरच्या धडक दिल्याने बाईक पलटली आणि दोघेही डंपरच्या चाकाखाली येऊन चिरडले गेले. मयत जोडपे हे अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहेत. दोघांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. (Two killed in car accident on Mumbai-Pune Expressway after driver lost control)