संभाजी मुंडे | बीड : सोलापुरात अख्ख कुटुंब तोल जाऊन बंधाऱ्यात पडल्याची घटना ताजी असतानाच बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईमधून (Ambajogai) देखील अशीच एक घटना समोर आली आहे. वाढदिवसासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू (Death by drowning in a well) झाला आहे. शहरातील स्वाराती रुग्णालय परिसरात असलेल्या कंपनी बागेतील विहिरीत बुडून या दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. निदा अल्ताफ शेख वय (16) आणि सानिया अल्ताफ शेख वय (18) अशी त्या बहिणींची नावे आहेत. आज या मुलींच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, त्यासाठी त्यांच्या वडिलांनी दोनही बहिणींना मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. मात्र त्यानंतर त्याचा मृतदेह स्वाराती रुग्णालय परिसरातील कंपनी बागेच्या विहिरीमध्ये आढळून आला आहे. या मुलींची पर्स या परिसरात शेळ्या चारत असलेल्या एकाला दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, निदा आणि सानिया यांची कौटुंबीक पार्श्वभूमी अतिशय गरिबीची आहे. त्या आपल्या आई-वडिलांसोबत अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स क्वार्टर भागात राहतात. अल्ताफ हे घरोघरी फिरून भांडे विक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी धुणीभांडी करते. शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. मात्र त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह कंपनी बागेच्या विहिरीमध्ये आढळू आला आहे. परिसरात शेळ्या चारण्यासाठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीला त्यांची पर्स आढळून आल्याने संबंधित प्रकार उघडकीस आला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. या मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास सुरू असून, घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Murder | माहीम बीचवर तरुणाची हत्या! हल्ल्यात जखमी झालेल्या प्रेसयीचाही हत्येमागे हात, का केला खून?
तिघेही बंधाऱ्यात पडले! बाबा वाचले, आई बेपत्ता, नाकातोंडात पाणी जाऊन 1 वर्षाचं बाळ तडफडून दगावलं
धंदा बसल्यानं जीवावर उठला! तलवार, चॉपरने थरारक हल्ला! उल्हासनगरात व्यापाऱ्याच्या जीवावर कोण उठलंय?