कोलकाता : सध्या लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच गेमिंग अॅप, ऑनलाईन व्हिडिओ गेमने पछाडले आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही तरुणांमध्ये या गेमचे वेड कमी होताना दिसत नाही. ऑनलाईन गेममुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील अशोकनगरमधील माणिकनगरमधील कांचनपल्ली येथे घडली आहे. याप्रकरणी बनगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणातील अशोकनगरमध्ये दोन तरुण रेल्वे रुळावर बसून ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळत होते. यावेळी तरुणांनी कानात हेडफोनही घातले होते. गेम खेळण्यात मग्न असल्याने आणि कानात हेडफोन असल्याने समोरुन येणाऱ्या लोकल ट्रेनकडे तरुणांचे लक्ष नव्हते. ट्रेनच्या मोटरमननेही वारंवार हॉर्न वाजवूनही गेम खेळण्यात मग्न असल्याने त्यांना हॉर्नचा आवाज ऐकू गेला नाही. अखेर लोकलखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला.
स्थानिक आणि जीआरपी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण दुपारी रेल्वे रुळावर बसून गेम खेळत होते. कानात इअरफोन्स बसवले होते. हे युवक खेळात इतके व्यस्त होते की विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनचेही त्यांना भान राहिले नाही. वारंवार हॉर्न वाजवूनही आवाज त्यांच्या कानापर्यंत न पोहोचल्याने दोघांचे मृतदेह रेल्वे रुळावर विखुरले गेले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांचे मुंडके धडापासून वेगळे झाले. संपूर्ण शरीर चिरडले गेले. तरुणांची ओळख पटू शकली नाही. ही घटना ठाकूरनगरमध्ये सायंकाळी 7 नंतर घडली, मात्र हे दोन्ही तरुण रेल्वे रुळावर खेळ का खेळत होते, हे समजू शकलेले नाही. बनगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी रेल्वे रुळाच्या बाजूला फोटोशूटसाठी जात असताना एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना एकादशीच्या पहाटे भद्रेश्वर केबिनजवळ घडली. धीरज पटेल असे मृताचे नाव आहे. धीरज हा भद्रेश्वर येथील झोपडी परिसरात राहत होता. एकादशीच्या दिवशी सकाळी त्याचे मित्र त्याला बोलावायला आले. त्याला रेल्वे लाईनच्या बाजूला फोटोशूट करायचे होते. तिघे मित्र मिळून रेल्वे लाईनच्या बाजूला गेले. साक्षीदारांनी सांगितले की, दुसरा माणूस एका तरुणाचे फोटो काढत होता. धीरज त्याला फोटो काढायला मदत करत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेनं एक ट्रेन येत होती, पण तो फोटो काढण्यात इतका गुंग होता की त्याला ट्रेन आल्याचंही कळलं नाही. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला पण त्याने ऐकले नाही आणि मृत्यूला कवटाळले.(Two youths killed while playing online video game in Bengal)
Bhopal Hospital Fire: लग्नाच्या 12 वर्षानंतर मूल झाले आणि आगीत गमावले! एकूण 7 मुलांचा मृत्यू