मुंबई : उदयपूर हत्याकांडातील आरोपी सध्या एनआयएच्या (NIA) ताब्यात आहेत. या आरोपींची कसून तपासणी केली असता काही बाबी समोर आल्या आहेत. कन्हैयालालला (Kanhayalal) मारण्याचा कट गुन्हा घडला, त्याच्या एक आठवडा आखण्यात आला होता. ज्यामध्ये गोस मोहम्मद, रियाझ अत्तारी या दोघींनी तयारीही सुरू केली होती. चाकू वापरून हत्या करण्याचा त्यांनी विचार केला. रियाझ आणि घौस हे दोघेही सुफी बरेलवी मुस्लिम आहेत. या दोघांनाही आता मृत्यूचं भय सतावतंय.”आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?”, असं हे दोघं एनआयएच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत. त्यांना भ्याड गुन्ह्याचा दावा करणारा व्हीडिओ शूट करण्यासाठी अजमेर दर्ग्याकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. शिवाय राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांना पत्र लिहिले आहे.
या दोनही मारेकऱ्यांना आता मृत्यूचं भय सतावतंय.”आम्हाला फाशीची शिक्षा होईल काय?”, असं हे दोघं एनआयएच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारत आहेत.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. उदयपूर घटनेच्या तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेतील आरोपी मोहम्मद रियाझ याच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बाबी लक्षात घेऊन एजन्सीने तपासाची व्याप्ती वाढवली पाहिजे, असे डोटासरा यांनी एनआयए महासंचालकांना सांगितलं आहे.
डोटासराने पत्रात लिहिले आहे की, मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथे जम्मू पोलिसांनी अटक केली. त्यापैकी दोन दहशतवाद्यांपैकी एक ताली हुसैन शाह हा भाजपच्या जम्मू अल्पसंख्याक मोर्चाचा सोशल मीडिया प्रभारीला देखील होता. डोटासरा म्हणाले, “सत्तेच्या लालसेपोटी भाजप देशविरोधी कारवायांना साथ देत नसल्याच्या या बातम्यांमुळे देशवासीयांमध्ये अस्वस्थता आहे. ही शंका दूर करण्यासाठी एनआयएने दोन्ही घटनांच्या तपासाची व्याप्ती वाढवली पाहिजे. स्थानिक भाजप नेत्यांचा जनतेशी काहीही संबंध नसून त्यांच्यात एक आंधळी शर्यत सुरू आहे, ज्यामध्ये त्यांना केवळ मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनायचे आहे.”