उधम सिंग नगर : उत्तराखंडच्या उधम सिंग नगरात झालेल्या डबल मर्डरचं रहस्य अजून कायम आहे. 24 तास उलटले तरी पोलिसांना या हत्याकांडाचा छडा लावता आलेला नाही. पोलिसांनी या खुनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण नदी शोधली. नदीत फक्त तीन पाय सापडले. या मृतांचे इतर अवयव पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर नदीत तीन पाय सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
काही तरुणांनी आपली बहीण हरवल्याची तक्रार नोंदवली होती. ही महिला तिच्या पाच सख्खे भाऊ आणि एका सावत्र भावासह राहत होती. ही तक्रार आल्यानंतर नदीत तीन पाय असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या घटनेचा तपास करत असतानाच एक 60 वर्षाचा बुजुर्ग व्यक्ती गायब झाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांची तपासाची सूत्रे वेगाने हलली. एकाच गावातून महिला आणि एक पुरुष गायब झाल्याची बातमी संपूर्ण गावात पसरल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. त्यातच नदीत तीन पाय सापडल्याने नागरिकांमध्ये तर भीतीचं वातावरण निर्माण झालं.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील लोकांना बोलावलं. त्यांना ते तीन पाय दाखवले. पण कुटुंबीयांना या पायांची ओळख पटली नाही. पोलिसांनी नदीतून हे तीन पाय ताब्यात घेतले. त्यानंतर बॉडीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी या मृतदेहाचे इतर शरीर शोधण्यासाठी डॉग स्क्वॉड टीमला घटनास्थळी पाचारण केलं. फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यता आलं. तसेच जीवरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी नदीत पाच किलोमीटरपर्यंत शोध घेतला. पण काहीच हाती लागले नाही.
बुधवारी आम्हाला मानवी शरीराचे काही अवयव सापडले आहेत. त्यामुळे इतर अवयव शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही लवकरच ही मर्डर मिस्ट्री सोडवू आणि आरोपींच्या मुसक्या आवळू, असं एसपी क्राईम चंद्रशेखर घोडके यांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांना अजूनही कोणताच क्ल्यू मिळालेला नाहीये. हे तीन पाय कुणाचे आहेत? ते नदीत कसे आले? याची काहीच माहिती पोलिसांना नाहीये. गावात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नदी परिसरात कोण आलं होतं? याचा उलगडा होणंही कठीण झालं आहेय