उज्जैन: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका कुटुंबातील तिघांनी कॅमेऱ्या समोर विष प्राशन केले. मुंबईतील एका पॉर्नस्टारकडून ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. ही घटना मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यात घडली आहे. विष प्राशन करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांनी असा आरोप केला की, मुंबईच्या मुलीने उज्जैन येथील रहिवासी आशी खान यांना ‘अवैध संबंधां’च्या नावाखाली ब्लॅकमेल केले. या तिघांचा विष पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पीडितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
“माझं नाव आशी खान आहे, उज्जैनमधील लोहे पुलचा मी रहिवासी आहे. ह्या माझ्या आई आणि पत्नी आहेत. मुंबईतील रिमझिम दास नावाची एक ‘पॉर्न स्टार’ मला पैशांसाठी ब्लॅकमेल करत आहे. मी जर तिचे पैसे दिले नाहीत तर आत्महत्या करेन, असे ती म्हणाली. माझ्या लग्नाच्या वेळी, मी तिला पैसे दिले आणि आता ती अजूनही जास्त पैशांचा आग्रह धरत आहे,” असे खान व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येत आहे.
“एकदा मी मुंबईत असताना तिने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवलं आणि तुरुंगात पाठवलं. तिने मला उज्जैनमधील तुरूंगातही पाठविण्यात यश मिळवले. आता ती आत्महत्या करणार असल्याचं सांगत आहे. आता, मी तिला यापुढे पैसे देऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही, एक कुटुंब म्हणून, विष प्राशन करीत आहोत.”
In a Shocking incident A family of three consumed poison in Ujjain after getting blackmailed by a Guwahati Girl working in Mumbai as an Air hostess and Porn Actress. She framed Cloth Marchant Ashi Khan in a false RAPE case and was extorting money from himpic.twitter.com/JW6TjNKvG4
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) December 23, 2022
मुंबईत कापड व्यापारी असलेल्या आशीची तिथल्या मुलीशी ओळख झाली. असा आरोप केला जात आहे की, मुलीने आधी मुंबईत आणि नंतर उज्जैनमध्ये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला ज्यामुळे त्याला तुरूंगात जावे लागले.