माढा – उजनी धरणाच्या (Ujjani Dam) कॅनॉलमध्ये पोहताना पंधरा वर्षीय मुलगा बुडाला आहे. त्यांच्या हातातली दोरी सुटल्याने तो बुडाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. माढा (Madha) तालुक्यातील भिमानगर येथे तो पोहण्यास गेला होता. त्याचं वय १५ वर्षं होतं. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. रोहन सुरेश पवार (Rohan Suresh Pawar) असं बुडालेल्या मुलाचं नाव आहे. तो भिमानगर येथे राहायला होता. स्थानिक नागरिक व मच्छीमार यांनी शोध घेतला. मात्र अद्याप त्याचा मृतदेह मिळून आलेला नाही. मुलगा बुडाल्याची बातमी परिसरात झपाट्याने पसरली. मुलगा बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तो दोरीच्या साहाय्याने कॅनॉलमध्ये पोहत होता. त्यामुळे तो पोहायला शिकत होता का ? अशी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे.
उजनी धरणाच्या कॅनॉलमधून शेतीला पाणी सोडलं जातं. हे पाणी गरजेनूसार सोडलं जातं. माढा तालुक्यातील भिमानगर येथे कॅनॉलमध्ये पाण्यात प्रमाण सुध्दा चांगलं असतं. काल दुपारी रोहन सुरेश पवार हा दुपारच्या सुमारास भिमानगर येथे कॅनॉलमध्ये पोहोण्यास उतरला. ज्यावेळी तो पाण्यात उतरला त्यावेळी त्याच्या हातात दोरी होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.