दक्षिण-पूर्व दिल्लीच्या कालिंदी कुंज भागात एका नर्सिंग होममध्ये युनानी डॉक्टरची गोळी मारुन हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे. मुख्य आरोपी आपल्या एका साथीदारासोबत रुग्ण बनून नर्सिंग होममध्ये आलेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबार करणाऱ्या आरोपीच रुग्णालयातील नर्सच्या मुलीसोबत अफेयर सुरु होतं. नर्सच्या पतीने आरोपीसोबत मिळून डॉक्टरच्या हत्येचं कारस्थान रचलं होतं. डॉक्टरच्या हत्येच्या बदल्यात नर्सच्या पतीने पोटच्या मुलीच लग्न आरोपीसोबत लावून देण्याच आश्वासन दिलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी नर्सिंग होमची महिला नर्स आणि तिच्या नवऱ्याची चौकशी केली.
खड्डा कॉलोनीच्या एका अरुंद गल्लीत तीन खाटांच नीमा रुग्णालय आहे. तिथे आरोपी उपचारांसाठी आला होता, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोन आरोपींपैकी एकाने गोळी चालवण्याआधी कंपाउंडरकडून आपल्या पायावर पट्टी बांधून घेतली. त्यानंतर औषध लिहून घेण्याच्या नावाखाली यूनानी डॉक्टर जावेद अख्तर यांची गोळी मारुन हत्या केली. या नर्सिंग होममध्ये काम करणारे आबिद यांनी सांगितलं की, डॉक्टर अख्तर मागच्या दोन वर्षांपासून इथे कार्यरत होते.
परवीन केबिनच्या आत गेली, त्यावेळी….
घटनेच्या दिवशी ते रात्री 8 च्या सुमारास ड्युटीसाठी आले होते. ड्युटीवरील नर्सिंग स्टाफ गजाला परवीन आणि मोहम्मद कामिल यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला. परवीन केबिनच्या आत गेली, त्यावेळी डॉक्टर अख्तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. आरोपीने एक दिवस आधी इथे येऊन रेकी सुद्धा केली होती.
डॉक्टरच्या हत्येची सुपारी का दिली?
मुख्य आरोपीच वय 16 वर्ष आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो आणि कॅप्शन पोस्ट केली. त्यात त्याने ‘2024 मध्ये मर्डर केली’ असं लिहिलं. नर्सचे डॉक्टरसोबत संबंध होते म्हणून तिच्या नवऱ्याने हत्येची सुपारी दिली.
आरोपीला पकडलं का?
संयुक्त पुलिस आयुक्त (दक्षिणी रेंज) एसके जैन यांनी सांगितलं की, पकडललेल्या आरोपीने डॉक्टरवर गोळी चालवली. त्याचं कृत्य नर्सिंग होमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.