बेरोजगारी आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण धक्कादायक, केंद्र सरकारने सादर केली मागील तीन वर्षांची आकडेवारी

| Updated on: Feb 10, 2022 | 9:33 PM

केंद्र सरकारने सादर केलेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या केली आहे.

1 / 5
देशात बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरी यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक आत्महत्या करत आहेत. आत्महत्येची गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी धक्कादायक आहे. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना  केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

2 / 5
नित्यानंद राय यांनी देलेल्या माहितीनुसार बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे 2018 मध्ये  4970,  2019 मध्ये 5908 आणि 2020  मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. 2020  मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

3 / 5
केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये बेरोजगारीमुळे 9140 जणांनी आत्महत्या केली आहे. तर 6,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळे आत्महत्या केली आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

4 / 5
पुढे बोलताना नित्यानंद राय यांनी म्हटले की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे 2020 मध्ये अनेकांचा रोजगार गेला. याच काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले.

5 / 5
बेरोजगारी ही देशापुढी सर्वात मोठी समस्या आहे, विविध क्षेत्रातील रोजगार वाढून बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी सरकार काही अत्यावश्यक पाऊले उचलत असल्याची माहिती देखील यावेळी राय यांनी दिली.