नवी दिल्ली : एनआयएच्या (NIA Raids) देशभरातील छापेमारीनंतर आता राजधानी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या जात आहेत. राजधानी दिल्लीमध्ये अमित शाह (Amit Shah) यांनी तातडीची बैठक बोलावलीय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीतील महत्त्वपूर्ण चर्चेतून नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एनआयए छापेमारीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
गेल्या काही दिवसांपासून एनआयए ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालंय. आठवड्याच्या सुरुवातीपासून देशभरात एनआयएनने छापेमारी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता दिल्लीत अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीदेखील या बैठकीला हजर आहेत. त्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही बैठकीला हजेरी लावल्याची माहिती मिळतेय.
Delhi | Union Home Minister Amit Shah chairs a meeting with officials including NSA, Home Secy, DG NIA on raids by NIA on PFI
(file pic) pic.twitter.com/rEuspoPaqX
— ANI (@ANI) September 22, 2022
संपूर्ण देशात एनआयए छापेमारी करतंय. त्यात महाराष्ट्रही असून राज्यातील मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकण्यात आलाय. पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेच्या शाखांवर छापे टाकण्यात आलेत. एकूण 20 जणांना अटकही करण्यात आलीय. एनआयएसोबत ईडी आणि एटीएसनेही मिळून ही संयुक्त कारवाई केलीय.
समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या नेरुळमधील सेक्टर 23 मध्ये पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आलीय. गेल्या सहा तासांपेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्यांकडून या कार्यालयात तपास केला जातोय. टेरर फंडिंगच्या संशयातून हा तपास केला जातोय.
मुंबई, पुणे, नाशिक नवी मुंबई, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद या ठिकाणी एनआयएनं छापेमारी करत कारवाई केलीय. छापेमारी केलेल्या सर्व ठिकाणी कसून तपास केला जातोय. त्यामुळे पीएफआयचं धाबं दणाणलं आहे.
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूतही एनआयएच्या पथकानं छापेमारी केलीय. टेटर फंडिंग होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयए एक्शन मोडमध्ये आलंय. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांना टेरर फंडिंग होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी समोर आणली होती. त्यानंतर 11 राज्यात छापे टाकण्यात आलेत.