लंडन : ब्रिटनमध्ये एक किळसवाणी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षकीपेशालाही काळीमा फासली आहे. एका शिक्षकाने 15 वर्षीय विद्यार्थ्यावर जबरदस्ती करुन अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोर्टाने आरोपी शिक्षकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ज्या शाळेत शिक्षक नोकरी करत होता त्या शाळेने त्याला नोकरीवरुन काढून टाकलं आहे. पीडित विद्यार्थ्यी हा दुसऱ्या शाळेत शिकत होता. दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती (unnatural raped on 15 year old boy by teacher).
आरोपी डेटिंग अॅपवर मुलांशी संपर्क करायचा
पीडित विद्यार्थी आणि आरोपी शिक्षकाची ओळख बार ग्रिंडर डेटिंग अॅपवर झाली होती. या डेटिंग अॅपवर ते एकमेकांशी बातचित करायचे. आरोपी शिक्षकाचं नाव क्रेग स्लेटर असं आहे. तो डेटिंग अॅपवर मुलांशी संपर्क करुन त्यांना भेटण्यासाठी प्रवृत्त करायचा (unnatural raped on 15 year old boy by teacher).
मुलाचं वय 15 असून त्याने डेटिंग अॅपवर लॉगिन केलं
संबंधित डेटिंग अॅपवर 18 वर्षांची वयोमर्यादा होती. मात्र, पीडित मुलाचे वय हे 15 वर्ष होतं. त्याने खोटी माहिती टाकून अॅपमध्ये आपलं अकाउंट सुरु केलं होतं. दुसरीकडे आरोपीने अॅपवर स्वत:चं नाव एंड्रयू स्पिल्टर असं ठेवलं होतं. याच नावाने तो पीडित मुलासोबत बातचित करायचा. तो मुलासोबत अडल्ट जोक मारायचा आणि तशा भाषेत बातचितही करायचा. याशिवाय तो आधीपासूनच एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तिच्याजवळ आपल्या रिलेशनशिप बद्दल काहीच सांगणार नाही, असं तो मुलाला सांगायचा.
पीडित मुलाला भेटण्यासाठी अनेकदा विनंती
स्लेटरने अनेकवेळा पीडित मुलाला भेटण्याची विनंती केली. मात्र, मुलगा काहीतरी कारण देऊन भेटणं टाळत होता. एकेदिवशी चॅट करताना त्याला मुलाच्या 16 व्या वाढदिवसाबद्दल माहिती मिळाली. वाढदिवसानिमित्ताने स्लेटरने महागडी वस्तू गिफ्ट म्हणून घेतली. त्यानंतर त्याने त्याला एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावलं. मात्र, हॉटेलमध्ये मुलाला भेटल्यावर त्याने त्याच्यासोबत जबरदस्ती करुन अनैसर्गिक सेक्स करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पीडित मुलाने कशीतरी त्याच्यापासून सुटका मिळवली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने आरोपीविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी स्लेटरला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल पुरावा म्हणून जप्त केला. याप्रकरणी कोर्टाने त्याला पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा : अपघात वार, राज्यात विविध अपघातात 7 ठार, 8 जखमी