महिला पोलीस अधिकाऱ्याला नको ते सुचलं… जेलमध्ये नको ते घडलं… कैद्यासोबतच… 

| Updated on: Jul 01, 2024 | 8:15 PM

महिला तुरुंग अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 30 वर्षीय महिला अधिकाऱ्याचे कारनामे या व्हिडिओमधून समोर आले आहेत. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्या महिला अधिकाऱ्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याला नको ते सुचलं... जेलमध्ये नको ते घडलं... कैद्यासोबतच... 
HMP Wandsworth Prison in London
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

दक्षिण पश्चिम लंडनमधील एचएमपी वँड्सवर्थ तुरुंगात एक हादरवणारी घटना घडली आहे. महिला तुरुंग अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिचे तुरुंगातील एका कैद्यासोबत संबंध आहेत. 30 वर्षीय महिला अधिकाऱ्याचे नाव लिंडा डी सौसा अब्र्यू असे आहे. फुलहॅम, पश्चिम लंडन येथील ती रहिवासी आहे. सार्वजनिक कार्यालयात असे कृत्य केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्या महिला अधिकारीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्या महिला अधिकाऱ्याला उक्सब्रिज मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहणार आहे. जिथे तिच्यावरील केसची सुनावणी होणार आहे.

शुक्रवारी हा सेक्स व्हिडिओ समोर आल्यानंतर महानगर पोलिसांनी तपास सुरू केला. हा व्हिडिओ तुरुंगात शूट करण्यात आल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती महिला अधिकारी प्रथम पूर्ण गणवेशात दिसत आहे. यानंतर ती आक्षेपार्ह अवस्थेत दिसली.

स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने या घटनेची माहिती देताना कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा दिला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाशी संबंधित इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

व्हिक्टोरियन काळात 1851 मध्ये एचएमपी वँड्सवर्थ तुरुंग बांधण्यात आले. या कारागृहाची अवस्था अत्यंत बिकट आहे. कारागृहात कैद्यांची संख्या जास्त असून ते जीर्ण झाले आहे. नुकतीच या कारागृहाची पाहणी करण्यात आली त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या. येथे अनेकदा हिंसक घटना घडल्याचे या पाहणीतून समोर आले.

तुरुंगात कर्मचारी वर्ग कमी आहे. कमी कैद्यांसाठी हे कारागृह बांधण्यात आले होते. पण, सध्या येथे 1500 हून अधिक कैदी आहेत. तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा ते 163 टक्के अधिक आहेत. कारागृहाची दुरवस्था लक्षात घेऊन येथे सुधारणा कार्यक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्यात कारागृहाचे मुख्य निरीक्षक चार्ली टेलर यांनी नोटीस बजावून कारागृहातील मूलभूत सुविधा वाढविण्याची मागणी केली होती. यानंतर तुरुंग गव्हर्नर केटी प्राइस यांनी राजीनामा दिला होता.