कुठल्याही नात्याचा पाया विश्वास, सत्य असतो. लग्न करताना, तर माणसाने प्रामाणिक असलच पाहिजे. असत्य, खोट्या पायावर उभं राहिलेलं नातं कधी टिकत नाही. एकदिवस सगळं कोसळून जातं. एका युवकाने खोट बोलून लग्न केलं. परिणामी आता लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. नवरी मुलीने सासऱ्याच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवलाय. उत्तर प्रदेशच्या गाजीपुरच हे प्रकरण आहे. निकाह करण्याआधी सासरच्यांनी आपल्याला खोटं सांगितलं. खेळण्याच मोठ दुकान आहे, घरात 10-10 नोकर काम करतात असं सांगितलं होतं. पण लग्न करुन सासरी आली, तर घरात हुंड्याच सामान ठेवायला पण जागा नव्हती. नवरा हातगाडीवर खेळणी विकतो असं विवाहितेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.
माझ्या माहेरच्यांनी सासरकडच्या लोकांना हुंड्यामध्ये बरच सामान दिलं. लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याने ते सामना विकून टाकलं, असा पीडितेने आरोप केलाय. विवाहितेच नाव तबस्सुम आरा आहे. जमानिया तहसील गावामध्ये ती राहते. तिचा निकाह फिरोज खानसोबत झाला. 19 ऑक्टोबर 2022 रोजी हे लग्न झालेलं. लग्नात हुंड्याच सामान दिलेलं. 4 लाखाचे दागिने दिले. फिरोजच खेळण्याचा दुकान आहे असं लग्नाच्यावेळी सासरकडच्यांनी सांगितलेलं. दरमहिन्याला 50 हजार रुपये कमावतो. दुकान संभाळायला 10 नोकर आहेत. मुलीकडच्यांना हे सगळं खर वाटल्याने ते तयार झाले.
हुंड्याच सामना विकून घर खर्च चालवला
नवरा दिवसभर हातगाडीवरुन खेळणी विकायचा. फसवणूक झाल्यामुळे ती नाराज झालेली. हळूहळू सर्व ठीक होईल असं नवऱ्याने तिला आश्वसन दिलेलं. सर्वकाही सहन केलं. तिला गर्भधारणा झाली. नवरा, सासरकडची मंडळी आणि घरातील अन्य सदस्यांनी हुंड्याच सामना विकून घर खर्च चालवला. त्यानंतर शिवीगाळ, मारहाण सुरु झाली.
कोणी बाळाला बघायला सुद्धा आलं नाही
महिलेने सांगितलं की, पुन्हा हुंड्याची मागणी सुरु झाली. तिने माहेरी हे सर्व सांगितलं. माहेरची माणस घरी आली, त्यानंतर सर्व वाद शांत झाला. पण सासरी तिचा अपमान सुरुच होता. नवऱ्याने गुंगीची गोळी देऊन काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली असं तिने सांगितलं. सासरी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून ती माहेरी निघून आली. या दरम्यान तिने एका बाळाला जन्म दिला. सासरकडून कोणी बाळाला बघायला सुद्धा आलं नाही. त्यानंतर तबस्सुमने नवरा, सासरे, सासू आणि नणदेसह सातजणांविरोधात तक्रार नोंदवली.