‘माझ्या मुलाने…’, लहान मुलांना कुहाऱ्डीने कापणाऱ्या साजिदबद्दल त्याची आई काय म्हणाली?

| Updated on: Mar 20, 2024 | 10:50 AM

पोलीस दोन्ही आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाचा शोध घेत आहेत. आरोपीच्या आईने चौकशीत काही खुलासे केले आहेत. आरोपी साजिदने कुऱ्हाडीचे घाव घालून 12 वर्षीय आयुष आणि 8 वर्षीय अहानची क्रूर पद्धतीने हत्या केली.

माझ्या मुलाने..., लहान मुलांना कुहाऱ्डीने कापणाऱ्या साजिदबद्दल त्याची आई काय म्हणाली?
badaun Double murder case
Follow us on

लखनऊ : दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने कापून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी साजिदला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये संपवलं. या गुन्ह्यांमध्ये साजिदसोबत त्याचा एक भाऊ सुद्धा सहभागी होता. पीडित कुटुंबाने पोलिसांना याची माहिती दिली. आरोपीने दोन्ही भावांची ज्या छतावर हत्या केली, ती जागा सील करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच बदायू शहर मंगळवारी रात्री झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे. गुन्हा घडला त्यावेळी मृत मुलांचे वडिल घरी नव्हते. ते कामासाठी बाहेर गेले होते. पत्नीचा फोन आला, त्यावेळी विनोद धावतपळत घरी आले. घरी येऊन पाहिलं, तर दोन्ही मुलांचे मृतेदह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. विनोद यांनी सांगितलं की, साजिद बरोबर त्यांच कुठलही शत्रुत्व नव्हतं.

विनोद यांच्या पत्नीकडे साजिदने 5 हजार रुपये मागितले होते. पैशाची मागणी करताना साजिदने सांगितलेलं की, त्याची पत्नी गर्भवती आहे. डिलीवरी होणार आहे. विनोद यांच्या पत्नीने साजिदला पैसे दिले. पैसे घेऊन चहाच्या बहाण्याने तो दोन्ही मुलांना छतावर घेऊन गेला. छतावर जेव्हा मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, तेव्हा आईने छताच्या दिशेने धाव घेतली. तिने पाहिलं की, साजिदचे कपडे रक्ताने माखलेले आहेत. त्याच्या हातात शस्त्र आहे. त्याने आयुष आणि अहान दोघांची हत्या केली होती. तिसरा मुलगा युवराजवर हल्ला करुन त्याला जखमी केलं होतं.

किती वाजता हे सर्व घडलं?

गुन्हा केल्यानंतर तो तिथून पळाला. विनोद यांनी सांगितलं की, साजिद आलेला त्यावेळी त्याचा भाऊ जावेदही सोबत होता. मुलांची आई संगिता यांनी सांगितलं की, साजिद आणि त्याचा भाऊ जावेद घरी आले होते. मी चहा बनवली. साजिद दोन्ही मुलांना छतावर घेऊन गेला व त्यांची हत्या केली. पोलीस आता जावेदच्या शोधात आहेत. मंगळवारी संध्याकाळी 6.30 ते 7 दरम्यान हा गुन्हा घडला.

त्या मुलांसोबत काय दुश्मनी होती?

आरोपी साजिदची आई नाजरीन सुद्धा या भयानक घटनेवर बोलल्या आहेत. “अनेक वर्षांपासून साजिद आणि जावेद दोघे एकत्र दुकानात काम करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सुद्धा दोघे एकत्र दुकानात गेले. कधीच त्यांचा कोणाबरोबर वाद झाला नाही. साजिदने दोन मुलांची हत्या का केली? ते मी नाही सांगू शकतं. त्या मुलांसोबत काय दुश्मनी होती?” पोलीस रात्री नाजरीनच्या घरी गेले. त्यावेळी तिला हे भयानक हत्याकांड आणि साजिदच्या एन्काऊंटरची माहिती मिळाली. अहान आणि आयुषच्या हत्येच दु:ख आहे. माझ्या मुलाने चुकीच केलं असं नाजरीन म्हणाली.

साजिद खोट बोलला का?

नाजरीन म्हणाल्या की, “साजिदने चुकीच केलं. त्यालाा त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. साजिदला अस करण्याची गरज नव्हती” माझी सून गर्भवती नाही असं तिने सांगितलं. म्हणजे साजिद खोट बोलत होता. 10-12 दिवसांपूर्वी सून माहेरी गेली. साजिदच्या पहिल्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.