हाताला रक्त लागलेलं, दोन कोवळ्या जीवांना संपवल्यानंतर निर्दयी साजिद त्या आईला म्हणाला, ‘आज काम…’

| Updated on: Mar 20, 2024 | 12:24 PM

संपूर्ण शहराला पोलीस छावणीच स्वरुप आलय. मृतांच्या नातेवाईकांची रडून रडून हालत खराब आहे. पोलिसांनी मुख्य हल्लेखोरांना एन्काऊंटरमध्ये संपवलं. पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

हाताला रक्त लागलेलं, दोन कोवळ्या जीवांना संपवल्यानंतर निर्दयी साजिद त्या आईला म्हणाला, आज काम...
badaun double murder case
Follow us on

लखनऊ : दोन लहान मुलांची अत्यंत निदर्यतेने कुऱ्हाडीने कापून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मुख्य गुन्हेगार साजिद पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. दुसरा आरोपी जावेद फरार आहे. साजिद आणि जावेद दोघे भाऊ आहेत. पोटच्या दोन मुलांच्या हत्या प्रकरणात विनोद कुमार यांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवलाय. सिविल लाइन पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला आहे. बदायूमध्ये विनोदच्या घरासमोरच साजिदच सलून होतं. मंगळवारी संध्याकाळी सात वाजता भाऊ जावेदसह साजिद विनोद यांच्या घरी आला. त्यावेळी विनोद घरी नव्हते.

विनोदची पत्नी संगीता आणि आई मुन्नी देवी घरी होत्या. विनोदची तिन्ही मुल घरी होती. मोठा मुलगा आयुष 13 वर्ष, मधला मुलगी पीयूष प्रताप 9 वर्ष आणि लहान मुलगा आहान प्रताप 6 वर्ष घरी होते. साजिद आणि जावेद मोटरसायकलवरुन विनोदच्या घरी आले होते. साजिद घराच्या आत गेला. जावेद बाहेर मोटरसायकलजवळ उभा होता. साजिदने विनोदची पत्नी संगिताला सांगितलं की, पत्नीची डिलीवरी होणार आहे. डॉक्टरांनी रात्री 11 ची वेळ दिली आहे.

तिने पाहिलं की, साजिद आणि जावेद दोघे….

मला खूप भीती वाटतेय, असं तो संगीताला म्हणाला. त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे आणण्यासाठी संगीता आत गेली. या दरम्यान साजीदने पीयूषला पुड्या आणण्यासाठी बाहेर पाठवलं. साजिद लहान मुलगा अहानला घेऊन घराच्या छतावर गेला. साजिदने भाऊ जावेदला सुद्धा घराच्या आत बोलावलं. पैसे घेऊन संगिता खोलीच्या बाहेर आली. त्यावेळी तिने पाहिलं की, साजिद आणि जावेद दोघे जिने उतरत होते.

हाताला रक्त लागलेलं

साजिदच्या हाताला रक्त लागलेलं. हातात चाकू होता. दोघे संगिताला पाहताच म्हणाले की, आज आम्ही आमच काम पूर्ण केलं. हे ऐकून संगिता घाबरली. तिने आरडा-ओरडा सुरु केला. संगीताचा मुलगा पियूष पुड्या घेऊन आला. साजिदने त्याच्यावरही चाकू हल्ला केला. पण या दरम्यान आसपासचे लोक जमा झाले होते. साजिदने हल्ल्यासाठी हात उगारताच पीयूष पळाला जमावाने साजिदला पकडलं. पण जावेद तिथून निसटण्यात यशस्वी ठरला.