तुरुंगात बंद असलेल्या कैद्याला भेटण्यासाठी बायको आली. पण पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी महिलेला अटक करुन कोर्टात सादर केलं. तिला सुद्धा तुरुंगात पाठवण्यात आलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असले, तुरुंगात नवऱ्याला भेटण्यासाठी गेलेल्या पत्नीला का अटक केली? तिने काय गुन्हा केला होता? तुरुंगात जाऊन भेटणं गुन्हा आहे का?. या प्रकरणात असं आहे की, पत्नी नवऱ्याला भेटण्यासाठी तुरुंगात केली. पण तिने त्यावेळी एक गुन्हा केला. म्हणून तिला अटक झाली. उत्तर प्रदेशच्या बिजनौर मधील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात बंद असलेल्या महिलेच्या नवऱ्याला नशेची सवय लागली होती.
नवऱ्याच्या इच्छेनुसार, पत्नी त्याला भेटायला जाताना स्वत:च्या प्रायवेट पार्टमध्ये चरस लपवून आली होती. चरस म्हणजे नशा. भेटायला येशील तेव्हा चरस घेऊन ये, असं आरोपी नवऱ्याने पत्नीला सांगितलेलं. त्यानुसार ती प्रायवेट पार्टमध्ये लपवून चरस घेऊन आलेली. तिच्याकडे आठ ग्रॅम चरस सापडलं. तिच्यावर संशय आल्यानंतर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलिसांनी तिला रोखलं. तपासणीमध्ये तिच्याकडे चरस सापडलं. त्यानंतर तिला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं.
त्या शिवाय तो राहू शकत नाही
अमरोहाच्या हसनपूर येथे राहणारा गुलशेर मागच्या काही दिवसांपासून एका गुन्हेगारी प्रकरणात बिजनौरच्या तुरुंगात बंद आहे. गुलशेरला नशेची सवय आहे. तो चरसची नशा करतो. व्यसन इतक जडलय की, तो नशा केल्याशिवाय राहू शकत नाही. याच नशेच्या नादात पत्नी अलमिनाला आता तुरुंगवास झालाय. अलमिना त्याला भेटण्यासाठी जेव्हा कधी तुरुंगात यायची, तेव्हा तो चरसची मागणी करायचा.
अखेर ती तयार झाली
आधी अलमिना तयार नव्हती, पण गुलशेरने दबाव टाकल्यानंतर ती जेलमध्ये नशेच सामान घेऊन यायला तयार झाली. दोन दिवसांपूर्वी अलमिना तुरुंगात पतीला भेटायला आलेली. त्यावेळी ती तिच्या प्रायवेट पार्टमध्ये 8 ग्रॅम चरस लपवून तुरुंगात आलेली.
तुरुंगात एकच खळबळ उडाली
तुरुंगात जाण्याआधी महिला पोलिसांनी तिची तपासणी केली. त्यावेळी त्यांना संशय आला. चेक केल्यानंतर अलमिनाकडे चरसच्या पुड्या सापडल्या. त्यामुळे तुरुंग प्रशासनात एकच खळबळ उडाली. लगेच अलमिनाला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आलं. नवऱ्याच्या नशेच्या सवयीमुळे आता पत्नी एनडीपीएस एक्टमध्ये तुरुंगात पोहोचली आहे.