22 जून रोजी उत्तर प्रदेशातील इटावा येथील ऊसराहार पोलीस स्टेशन (Police station) परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस तपासात समजले की, ही महिला राजस्थानची (Rajasthan) रहिवासी असून ती आपल्या दोन मुलांसोबत येथे राहत होती. खतरनाक बाब म्हणजे तिच्या प्रियकराने तिची गोळ्या झाडून हत्या केलीयं. महिलेचा (Women) प्रियकर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये चालक होता, तो इटावाजवळील ऊसराहारचा रहिवासी आहे. ही महिला दोन वर्षांपासून प्रियकरासोबत त्याची पत्नी म्हणून राहत होती. विशेष म्हणजे नाल्यात सापडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी दोन वर्षांपूर्वी तिची आणि मुलांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सांगितले की, गजेंद्र नावाचा तरुण त्याची पत्नी मिथिलेशसोबत नोएडा येथे राहत होता. गजेंद्र आणि सतीश दोघेही ट्रॅव्हल एजन्सीमध्ये चालक होते. दोघांमध्ये मैत्री झाली, त्यानंतर सतीशचे गजेंद्रची पत्नी मिथिलेशसोबत अफेअर सुरू झाले. यादरम्यान, सतीश, गजेंद्र आणि त्याची पत्नी मिथिलेश इटावाला भेटायला आले. तेथे सतीश यादव याने मिथिलेशसह तिचा पती गजेंद्र याला दारू प्यायला लावली आणि नंतर कारमध्ये एकट्याला बसून सीट बेल्ट बांधून कार कालव्यात फेकून दिली.
गजेंद्रचा मृतदेह हवाई पट्टीजवळील कालव्यातून बाहेर काढण्यात आला, तेथे पोस्टमॉर्टममध्ये गजेंद्रचा मृत्यू कालव्यात बुडल्यामुळे झाल्याचे कळले. यानंतर मिथिलेश दोन महिन्यांसाठी राजस्थानमधील झुंझुनू येथे सासरच्या घरी राहण्यासाठी गेली. तेथून ती दोन्ही मुलांना घेऊन कोणालाही न सांगता सतीशसोबत इटावा येथे आली. यानंतर सतीश आणि मिथिलेश पती-पत्नी म्हणून राहू लागले. दोन वर्षानंतर सतीशला मिथिलेशचे कुठेतरी अनैतिक संबंध असल्याचा संशय येऊ लागला. यावर सतीशने मिथिलेशला पूजेच्या बहाण्याने मंदिराजवळील जंगलात नेले.
सतीशने मिथिलेशला जंगलात नेऊन गोळ्या झाडल्या. यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. मयत महिलेने वधूप्रमाणे वेशभूषा केली होती, तिच्याकडे नारळ, तांदूळ आणि पूजेचे सर्व साहित्य होते. वरिष्ठ पोलीस अधीक्षक जय प्रकाश सिंह यांनी सांगितले की, सतीश यादवने मिथिलेशचा पती गजेंद्र याचीही हत्या केली होती, त्यात मिथिलेशने त्याला साथ दिली होती. त्यानंतर सतीश आणि मिथिलेश पती-पत्नीसारखे राहत होते. यानंतर सतीशने तिचीही हत्या केली आहे.