दर्ग्यात आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेने मौलवीवर बलात्काराचा आरोप केला आहे. मौलवीने महिलेचा अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलीस उपाधीक्षक आलोक मिश्रा यांच्यानुसार, महिला दर्ग्यामध्ये आशिर्वाद आणि उपचारांसाठी गेली होती. पीडित महिला बिजनौरची आहे. मागच्या आठवड्यात मंगळवारी महिलेने सीनियर पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना घडली.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती मागच्या वर्षभरापासून झाड-फूंकच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी बदायूमध्ये राहतेय. दर्ग्यामध्ये ओढणी आणि चादरीच दुकान असलेल्या मौलवीने तिला उपचाराच आश्वासन दिलं. इलाज करण्याच्या नावाखाली तो खोलीमध्ये घेऊन गेला. तिथे मौलवीने आपल्यावर बलात्कार केला, असा महिलेचा आरोप आहे.
अश्लील व्हिडिओ बनवला
इतकच नाही, आरोपी मौलवीने महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला. पीडित महिलेच म्हणणं आहे की, आरोपी उपचाराच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार करत होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
नदी किनाऱ्यावर ‘बड़े सरकार’ चा प्रसिद्ध दर्गा
कोतवाली क्षेत्रात बदायूं-दिल्ली मार्गावर सोत नदी किनाऱ्यावर ‘बड़े सरकार’ चा प्रसिद्ध दर्गा आहे असं पोलीस अधिकारी आलोक मिश्रा यांनी सांगितलं. मानसिक आजारांवर झाड-फूंकच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी लोक इथे लांबून-लांबून येतात.