लखनौ : पतीला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. पत्नीच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी त्याने मांत्रिकाचा आधार घेतला. मात्र या नादात पतीलाच आपले प्राण गमवावे लागले. मांत्रिकाच्या भेटीवेळी ओळख झालेल्या एका व्यक्तीनेच या पतीची हत्या केली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे.
काय आहे प्रकरण?
नीरज दीक्षित असे या प्रकारात प्राण गमवावे लागलेल्या पतीचे नाव आहे. मांत्रिकाकडे येणं-जाणं असताना त्याची ओळख शैलेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी मांत्रिकाकडे जात असे. काही दिवसांतच शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली.
मांत्रिक पूजा करुन पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल, असं सांगून शैलेंद्रने नीरज दीक्षितकडून 75 हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे नीरजने शैलेंद्रकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली.
दुसऱ्या मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला
हमीरपूरमधील एका बड्या मांत्रिकाकडे जाण्याचं शैलेंद्रने नीरजला सुचवलं. पत्नीच्या प्रियकरापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीरज घायकुतीला आला होता. तो त्यासाठी तयार झाला. मात्र शैलेंद्रने वेगळाच प्लॅन आखला होता. शैलेंद्रने आपले मित्र धर्मेंद्र आणि श्यामू यांच्या साथीने नीरजची हत्या केली.
चार दिवसांनी बेपत्ता
13 ऑगस्टला फजलगंज भागातून बेपत्ता झालेल्या नीरजचा मृतदेह 17 ऑगस्टला हमीरपूरच्या जंगलात सापडला होता. पोलिसांनी शैलेंद्र आणि धर्मेंद्र यांना अटक केली. नीरजला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे तो महाराजपूरला मांत्रिकाकडे जायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बाईकही जाळली
आरोपींनी घटना लपवण्यासाठी तीन जिल्ह्यांचा वापर केला. कानपूरच्या फजलगंज भागातून त्यांनी नीरजला उचललं. मांत्रिकाला भेटवण्याच्या बहाण्याने हमीरपूरच्या जंगलात नेऊन त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याची बाईक फतेहपूर जिल्ह्यात नेऊन जाळली. मात्र कॉल डिटेल्समुळे या घटनेचा पर्दाफाश झाला.
संबंधित बातम्या :
वॉचमनला मारहाण करुन घरफोड्या, सीसीटीव्हीत कैद झालेली टोळी अंबरनाथमध्ये कशी सापडली?
बायकोचे आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवले, भावोजींकडून धमकावून बलात्कार