लखनौ : लेकीच्या कपाळावर प्रियकराच्या नावाचं कुंकू पाहून भडकलेल्या आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापाच्या भरात मारहाण करुन आईने अखेर आपल्याच मुलीचा गळा दाबला. उत्तर प्रदेशातील इटावा शहरात बैदपुरा पोलीस ठाण्या अंतर्गत उमराई गावात 28 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
कमला देवी रात्री उशिरा आपल्या लहान मुलीसह घरी परतली, तेव्हा 17 वर्षीय मुलगी प्रिया (नाव बदलले आहे) हिच्या भांगेत सिंदूर पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कमला देवीने आपल्या अविवाहित मुलीला कपाळावरील कुंकवाचे कारण विचारले, तेव्हा मुलीने गावातीलच एका तरुणाच्या नावाने सिंदूर लावल्याचं सांगितलं. त्यानंतर संतप्त झालेल्या आईने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिचा गळा दाबला, ज्यामुळे प्रियाचा जागीच मृत्यू झाला.
मुलीला फासावर लटकावलं
आपल्या हातून मुलीची हत्या झाल्याचं जेव्हा आईला समजलं, तेव्हा तिने धोतराने फास बनवून मृतदेह लटकवला आणि शेजारच्या लोकांना कळवले. तोपर्यंत इतर नातेवाईकही घरी आले होते. 112 क्रमांकाद्वारे पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर मृतदेह फासावरुन खाली काढण्यात आला. घटनेच्या दिवशी कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेले होते. प्रियांका घरी एकटी होती.
मुलीच्या प्रियकरावर आरोप
प्रियाची आई कमला देवीने रडत सांगितले होते की तिने गावातील एक तरुण राजकुमारला घरातून बाहेर पडताना पाहिले आहे. एवढंच नाही तर तिने प्रियाचा बॉयफ्रेण्ड राजकुमारवर खून आणि बलात्काराचा आरोपही केला होता. कुटुंबाने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये राजकुमारच आरोपी असल्याचा दावा केला होता. पण, जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हळूहळू सर्व रहस्य उघड झाली.
पोलिसांनी तीन दिवसात छडा लावला
घटनेनंतर 3 दिवसांनी खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, मृत प्रियाचे गावातील राजकुमार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी प्रियांकाने भांगेत सिंदूर भरला होता, त्यानंतरच ही सर्व घटना घडली. दुसरीकडे, लेकीची हत्या करणाऱ्या आईनेही कबूल केले की, जेव्हा ती लहान मुलीसोबत घरी परतली, तेव्हा मोठ्या मुलीच्या कपाळावर कुंकू पाहून तिला राग आला आणि रागाच्या भरात आपल्या हातून तिची हत्या घडली. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करुन आरोपीला आईला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
संबंधित बातम्या :
14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला
विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या, 23 वर्षीय विवाहितेला बेड्या
बॉयफ्रेण्डने विचारले ही मुलगी कुणाची, आईकडून रागात एक महिन्याच्या मुलीची हत्या