Marriage dispute | पत्नी शरीरसंबंध ठेवत नाही म्हणून नवऱ्याची कोर्टात धाव, कोर्टाने काय म्हटलं?

| Updated on: Sep 08, 2023 | 3:04 PM

Marriage dispute : हे संपूर्ण प्रकरण कोर्टाने गांभीर्याने घेतलं आहे. पाच डॉक्टर्सच पॅनल बनवून पत्नीची मेडिकल तपासणी करण्याचे सीएमओला आदेश दिले आहेत. लग्नाला शुन्य घोषित करण्याच अपील केलं आहे.

Marriage dispute | पत्नी शरीरसंबंध ठेवत नाही म्हणून नवऱ्याची कोर्टात धाव, कोर्टाने काय म्हटलं?
love life
Follow us on

लखनऊ : वैवाहिक जीवनात मतभेद तीव्र झाले, एकत्र राहू शकत नाही, हे लक्षात आल्यावर जोडपी विभक्त होण्यासाठी कोर्टात धाव घेतात. आता एका व्यकीने एका वेगळ्याच कारणासाठी घटस्फोट मागितला आहे. आपली पत्नी ट्रान्सजेंडर असल्याचा या व्यक्तीचा दावा आहे. कोर्टाने आता पत्नीची मेडीकल टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. शहराच्या शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने कोर्टात खटला दाखल करुन लग्नाला शून्य घोषित करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर कोर्टात हा खटला दाखल झाला आहे. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. पण पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती असं पतीने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला आहे. डॉक्टरानी तपासणी केली, त्यावेळी पत्नीचे अनेड बॉडी पार्ट्स तयार झाले नसल्याच लक्षात आलं.

हे संपूर्ण प्रकरण कोर्टाने गांभीर्याने घेतलं आहे. पाच डॉक्टर्सच पॅनल बनवून पत्नीची मेडिकल तपासणी करण्याचे सीएमओला आदेश दिले आहेत. तपासणी रिपोर्ट लवकरच कोर्टात सादर करण्याच फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशाने सीएमओला आदेश दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर सीएमओने पाच डॉक्टर्सच पॅनल बनवलं आहे. शुक्रवारी तपासणी होईल. नवऱ्याने या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात 2021 मध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. कुठलही विवेचन केल्याशिवाय मेडिकल रिपोर्ट बनवला होता. पतीने या रिपोर्टला कोर्टात आव्हान दिलं आहे.

शारीरिक संबंध नसतील तर घटस्फोट घेता येतो का?

कानपूरमधील हे अशा प्रकारच पहिलं प्रकरण आहे असं कायद्याच्या जाणकारांनी सांगितलं. वरिष्ठ वकील विजय बक्शी यांनी सांगितलं की, पत्नी शारीरिक संबंध बनवण्यासाठी सक्षम नसेल, तर त्या आधारावर घटस्फोट घेतला जाऊ शकतो. सध्या नवऱ्याने हिंदू मॅरेज एक्टच्या कलम 12 अंतर्गत लग्नाला शुन्य घोषित करण्याच अपील केलं आहे.