असं म्हणतात प्रेमात कुठलही बंधन नसतं. प्रेम कुठल्याही वयात होतं. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये असच एक प्रकरण समोर आलं आहे. इथे चार मुलांची आई तिच्यापेक्षा वयाने 33 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. हे प्रेम या टोकाला पोहोचलं की, ती प्रियकरासोबत पळून गेली. महिलेच्या मुलीने आईचा शोध घेण्याची पोलिसांना विनंती केली. पोलिसांनी महिलेला शोधून काढलं, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गोंधळ झाला.
साढ पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुंडनी भागातील गावात ही 51 वर्षाची महिला राहते. तिचा नवरा बाहेरगावी नोकरी करतो. त्याला चार मुलं आहेत. सर्वात मोठ्या मुलीच लग्न झालय. अन्य तीन मुलं घरातच राहतात. गावापासून पाच किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या एका 18 वर्षीय मुलासोबत या महिलेची ओळख झाली.
महिलेच्या मुलांना याबद्दल समजल्यानंतर त्यांनी…
हळू-हळू दोघांची ओळख मैत्रीत बदलली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लपून-छपून भेटायला सुरुवात केली. 18 वर्षाचा तिचा प्रियकर महिलेच्या घरी येऊ-जाऊ लागला. महिलेच्या मुलांना तिच्या या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विरोध सुरु केला. प्रियकराला त्यांनी धमकावलं. मात्र, त्यानंतरही महिला आणि तिच्या प्रियकराच भेटणं बंद झालं नाही.
गावाच्या बाहेर शेतामध्ये भेटायचे
दोघे गावाच्या बाहेर शेतामध्ये भेटायचे. त्यावेळी मुलांनी आपल्या आईवर नजर ठेवायला सुरुवात केली. एक दिवस संधी साधून महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. महिला तिच्या प्रियकराच्या घरी राहू लागली. महिलेच्या मुलाना जेव्हा याबद्दल समजलं, तेव्हा अब्रू जाईल म्हणून सर्वप्रथम त्यांनी घराच्या बाहेर पडणं बंद केलं. त्यानंतर मुलीच्या विवाहित मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आईला शोधण्याची विनंती केली.
सोबतच राहण्याची जिद्द करु लागले
मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु केला. पोलिसांनी लवकरच दोघांना शोधून काढलं. दोघांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. महिला आणि तिचा प्रियकर काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. सोबतच राहण्याची जिद्द करु लागले. पोलीस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ घातला. बरच समजावल्यानंतर दोघांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवलं. आता ही लव्ह स्टोरी संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनली आहे.