मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथे एका तांत्रिकाने चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी क्रुरतेचा कळस गाठलायं. अडीच वर्षाच्या कोवळ्या लेकराचा बळी घेतला. पोलिसांनी (Police) तांत्रिक भोला उर्फ हुकुम सिंग याला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने (Accused) सांगितले की, त्याची तांत्रिक शक्ती संपत चालली होती, ताकद वाढवण्यासाठी त्याला चामुंडा देवीला प्रसन्न करणे गरजेचे होते आणि त्यामुळे त्याने या मुलाचा बळी दिलायं. हे प्रकरण 15 जून रोजी जगनेर पोलीस ठाण्यातील एका गावामध्ये घडले आहे. या तांत्रिकाच्या अंधश्रध्देमुळे एका निष्पाप लेकराचा बळी गेला.
चामुंडा देवीला प्रसन्न करण्यासाठी एका तांत्रिकाने रामावतारचा मुलगा ऋतिकचा बळी दिला. गुन्हा लपवण्यासाठी तांत्रिकाने मुलाचा मृतदेह पोत्यात भरून किबार नदीत फेकून दिला. इकडे रामअवतार यांनी आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी जमीन आसमान एक केले होते. खूप प्रयत्न करूनही आपला मुलगा भेटत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.
रामअवतार यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता मुलाचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर गावातील एका व्यक्तीने पोलिसांची मदत केली. तांत्रिकसोबत जाताना त्याने हृतिकला पाहिल्याचे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिकला अटक करून चाैकशी केली असता धक्दाकायदक माहिती पुढे आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हुकुम सिंग उर्फ भोला हृतिकचे वडील रामअवतार यांच्या जमिनीवर डोळा ठेऊन होता. हृतिकचे वडील रामअवतार यांना तांत्रिकच्या वडिलांनी दत्तक घेतले होते. हुकुम सिंगला वाटले की जर त्याने हृतिकला मारले तर रामअवतार गाव सोडून जाईल आणि जमीन आपल्याला मिळेल. हुकुम सिंगचा तंत्र-मंत्रावरही खूप विश्वास आहे. त्याला वाटले की हृतिकला मारल्याने देवीही प्रसन्न होईल म्हणजेच काय तर एका दगडात दोन तीर.
आग्रा ग्रामीणचे एसपी सत्यजित गुप्ता यांनी सांगितले की, आरोपीला वाटत होते की त्याची तांत्रिक शक्ती काम करत नाहीये. जर त्याने मुलाचा बळी दिला तर त्याची शक्ती परत येईल. मुलगा खेळत असताना आरोपीने त्याला आपल्यासोबत नेऊन त्याची हत्या केली. त्याला मारल्यानंतर त्याने मुलाचा मृतदेह देवीच्या समोर ठेवला आणि मंत्रोच्चार केला. यानंतर मुलाचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकला.