एका कुत्र्यानं चिमुरडीवर जीवघेणा हल्ला (Dog Attack) केला. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 16 वेळा एक कुत्रा 9 वर्षांच्या मुलीला चावला. पाठलाग करुन या कुत्र्यानं चिमुरडीवर हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीची प्रकृती नाजूक आहे. दरम्यान, जो कुत्रा लहान मुलीला चावला, तो रस्त्यावरचा नसून पाळलेला कुत्रा होता. ही गोष्ट कळल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे. दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियात व्हायरल (Video Viral in Social Media) झाला आहे. पाळीव कुत्र्यांच्या मालकाला पोलिसांनी अखेर याप्रकरणी दोषी ठरवत ताब्यात घेऊन अटक केली आहे.
ही धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे चेन्नईमध्ये. एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीच्या आधारं, एक 9 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होतं. त्याचवेळी एक माणूस आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्याला घेऊन बाहेर हिंडायला निघाला होता. त्याच वेळी नेमका अचानकपणे कुत्र्यानं या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केली.
ही घटना 28 डिसेंबरला घडली. चेन्नईच्या नोलंबूरमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आजतकने दिली आहे. नोलंबूरच्या श्रीराम नगर परिसरात एक कुटुंब राहत होतं. त्यांची नऊ वर्षांची मुलगी या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाली आहे.
श्रीराम नगरमध्ये राहणारी एक ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या घरातून बाहेर फिरण्यासाठी निघाली होती. तेव्हा या कुत्र्याचीही मालकीणही आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायाला निघाली होती. याच दरम्यान, कुत्रा या 9 वर्षांच्या मुलीच्या आधी मागे लागला. कुत्रा मागे लागल्याचं पाहून प्रचंड घाबरलेली मुलगी जीवाच्या आकांतानं कुत्र्यापासून पळू लागली. पण कुत्र्यासमोर तिची धाव तोकडी पडली.
अखेर कुत्र्यानं या नऊ वर्षांच्या मुलीला गाठलं. तोल जाऊन एका ठिकाणी ही मुलगी पडली. नेमक्या त्याच क्षणी उठायच्या आत कुत्र्यानं या मुलीवर हल्ला केला. यावेळी पाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 16 वेळा मुलीचा चावा घेतला. ही घटना पाहिल्यानंतर स्थानिक लोकांनी लगेचंच मुलीच्या दिशेनं धाव घेतली. मात्र तोपर्यंत कुत्र्यांनं केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
याप्रकरणी चेन्नईतील नोलंबूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी पाळीव कुत्र्यांची मालकीण असलेल्या विजयालक्ष्मी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर गंभीर जखमी असलेल्या मुलीवर उपचार सुरु आहेत.
சென்னை முகப்பேரில் அடுக்குமாடி குடியிருப்பில் 9 வயது சிறுமியை நாய் துரத்தி கடிக்கும் காட்சி…
நாய் உரிமையாளர் கைது…
நாய் வளர்ப்பவர்கள் கவனமாக வளருங்கள்…#chennaipolice pic.twitter.com/bBRdYs1psC
— Krishna (@krishna_journa) January 4, 2022
Viral Video | गाय-कुत्रा एकमेकांच्या मिठीत, गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Shocking | ‘बरं झालं तो मेला’ मुलाच्या मृत्यूनंतर असं कुणी म्हणतं? मग या आईनं का म्हटलं?