Lawrence Bishnoi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नाई याच्या नावाची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. तो गुजरातमधील साबरमती कारागृहात बंद आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांत तीन मोठ्या हत्या त्याने घडवून आणल्या. यामुळे देशातच नाही तर कॅनडा पोलिसांनाही त्याची कस्टडी हवी आहे. 2022 मध्ये पंजाबमधील मानसा गावात पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणात त्याचे नाव समोर आले. त्यानंतर 2023 मध्ये कॅनडामधील खलिस्तानवादी अतिरेकी हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात त्याचे नाव जोडले गेले आहे. त्यानंतर आता बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचे समोर येत आहे. कोण आहे हा लॉरेन्स बिश्नोई? त्याचा गुरु किंवा हिरो कोण आहे?
लॉरेन्स बिश्नोई याचा हिरो किंवा गुरु संदर्भात हिंदुस्तान टाइम्समध्ये रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार लॉरेन्स बिश्नोई यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. एका डीएसपी नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यानुसार गुन्हेगारी जगात लॉरेन्स बिश्नोई याचा कोणीही गुरु नाही. तो स्वत:ला मोठा हिरो समजतो.
लॉरेन्स बिश्नोईची तीन वेळा चौकशी करणारा अधिकारी म्हणाला, लॉरेन्स बिश्नोई याने बुडैल, बठिंडा, पटियाला, तिहार, गुजरात आणि राजस्थानमधील कारागृहात अनेक दिवस राहिला आहे. कारागृहात त्याला एकटे ठेवले नाही. त्यामुळे कारागृहात असलेल्या इतर गँगस्टरसोबत त्याने संबंध निर्माण केले आहे. पंजाबमधील अनेक युवक विदेशात आणि कॅनडात आहे. बिश्नोई त्यांच्याकडून आपले कामे करुन घेतो. तो कोणत्याही देशात कोणतीही काम करु शकतो, अशी त्याची गँग तयार झाली आहे.
बिश्नाई गँगमध्ये सदस्य किती हे सांगता येत नाही. परंतु चौकशीत त्याने आपण कुठूनही कोणताही कामगिरी फत्ते करु शकतो, असे त्याने म्हटले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिश्नोईचा जवळचा सहयोगी संपत नेहरा हरियाणामधील ऑपरेशन पाहतो. गोल्डी बरार हा अमेरिकेत राहतो. तो भारताच्या बाहेरची जबाबदारी आणि पंजाबमधील कामगिरी पार पाडतो. दीपक कुमार उर्फटीनू, रवींदर उर्फ काली राजपूत आणि संदीप उर्फ काला जठेरी हे लॉरेन्स बिश्नोई याचे जवळचे सहकारी आहे. गोल्डी बरार सोडून इतर सर्व जण कारागृहात आहेत.