नवी दिल्ली : संपूर्ण देश सध्या कोरोना संकटाविरोधात झुंजत आहे. मात्र, या संकट काळत ऑक्सिजन पासून औषधांपर्यंत अनेक मेडिकल साहित्यांचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशा घटना समोर आल्या आहेत. राजधानी दिल्लीत शहरातील प्रसिद्ध उद्योगपती नवनीत कालरा हा देखील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुरुवारी-शुक्रवारी टाकलेल्या छापामारीत 500 पेक्षा जास्त कॉन्सेन्ट्रेटर हाती लागले आहेत. या छापेमारीतूनच नवनीत कालरा यांचं नाव समोर आलं आहे (Who is Navneet Kalra whose name came in black marketing of oxygen concentrator in Delhi).
नवनीत कालरा कोण आहे?
नवनीत कालरा हे दिल्लीतील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. दयाल ऑप्टिकल्स, खान चाचा, नेगे अँण्ड जू, टाऊन हॉल रेस्टोरंट-बार आणि मिस्टर चाऊ या सगळ्या हॉटेल्समध्ये पार्टनर आणि त्यांच्या मालकिचे असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे तो फेसबुकवर नेहमी सेलेब्रिटी आणि क्रिकेटपटूंसोबत फोटो शेअर करत असतो (Who is Navneet Kalra whose name came in black marketing of oxygen concentrator in Delhi).
नवनीत कालराचा व्हाट्स अॅप ग्रुप?
पोलिसांनी सर्वात आधी नेगे अँण्ड जू बारमध्ये छापा टाकला. त्यानंतर लोधी कॉलनीतील टाऊन हॉल रेस्टॉरंट आणि बारमध्ये छापा टाकला. तिथे 9 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आले. त्यानंतर खान चाचा रेस्टॉरंटमधून तब्बल 96 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आले. दुसरं म्हणजे नवनीत कालरा याचा या प्रकरणाशी संबंधित व्हाट्स ग्रुपदेखील असल्याची माहिती समोर आलीय. आता या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करत आहेत.
गस्तीवर असताना पोलिसांना संशय
पोलीस बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास लोधी कॉलनीत गस्तवर असताना नेगे जू रेस्टॉरंट अँण्ड बार सुरु असलयाचं त्यांच्या निदर्शनास आलं. पोलीस त्या बारच्या आतमध्ये शिरले. तेव्हा तिथे एक व्यक्ती लॅपटॉपवर काम करताना दिसला. तो ऑक्सिन कॉन्सेन्ट्रेटरची ऑनलाईन ऑर्डर घेत होता. पोलिसांना हे सगळं संशयास्पद वाटलं. त्यांनी रेस्टॉरंट पिंजून काढलं. त्यानंतर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गँगचा भंडाफोड झाला. पोलिसांना तिथे 32 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, थर्मल स्कॅनरचा एक डब्बा आणि N95 मास्कचा एक डब्बा मिळाला. या रेस्टॉरंटचा मालक नवनीत कालरा असल्याचं नंतर उघड झालं.
हेही वाचा : कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा