नवी दिल्ली : एक खूपच आगळं-वेगळं प्रकरण समोर आलय. तुम्ही सुद्धा चक्रावून जालं. बायकोला, नवऱ्याच बाहेर दुसर प्रेम प्रकरण सुरु आहे असं समजलं, तर तिची प्रतिक्रिया काय असेल?. सहाजिकच ती चिडेल, वैतागेल. पण इथे असं नाहीय. बायकोच नवऱ्याच दुसर लग्न लावून देण्यासाठी इरेला पेटलीय. महिलेच्या पतीनेच पत्नीकडे वस्तीतील सुंदर मुलीबरोबर लग्न लावून देण्याची मागणी केलीय. असं झालं नाही, तर जीव देण्याची धमकी या पतीराजांनी दिली आहे. त्यामुळे महिलेला या मुलीसोबत नवऱ्याच लग्न लावून द्यायच आहे. वस्तीमधील लोक या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती कोणाच काही ऐकून घ्यायला तयार नाहीय. महिला हा विषय घेऊन पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. पोलिसांच्या मते, त्यांच्यासमोर आलेलं हे पहिलं प्रकरण आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.
सदर महिला, नवरा आणि मुलांसह सदर बाजार पोलीस ठाणे क्षेत्रात राहते. काही दिवसांपूर्वी महिला बाळंत झाली. त्यावेळी महिलेची देखभाल करण्यासाठी एक सुंदर मुलगी तिच्या घरी आली होती. त्यावेळी महिलेच्या नवऱ्याला, देखभाल करायला आलेली ती मुलगी आवडली. तिच्यावर जीव जडला. त्याला मनापासून ती आवडू लागली. काही दिवसांनी ही मुलगी आपल्या घरी निघून गेली. त्यानंतर महिलेचा पती खूप उदास रहायचा. पत्नीने नवऱ्याला शांत रहाण्याच कारण विचारलं, त्यावेळी त्याच्या उत्तराने महिला हैराण झाली.
महिलेच्या नवऱ्याने तिला काय सांगितलं?
महिलेच्या नवऱ्याने सांगितलं की, देखभाल करायला आलेल्या मुलीवर त्याचा जीव जडला आहे. तिच्याशी लग्न झालं नाही, तर प्राण देईन. त्यामुळे घाबरलेली महिला त्या युवतीच्या घरी गेली. आपल्या नवऱ्याशी युवतीच लग्न लावून देण्याची कुटुंबीयांकडे मागणी केली. मुलीच्या कुटुंबीयांना हे अजिबात आवडलं नाही. त्यांनी महिलेला सुनावल व तिथून पाठवून दिलं. एक महिला स्वत:ची सवत शोधायला निघाल्याच हे पहिल प्रकरण आहे असं पोलिसांनी सांगितलं. सध्या याच प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.